
हुकूम मुलाणी
मंगळवेढा : सकाळ वृत्तसेवा :-रत्नागिरी -नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर मंगळवेढा ते सोलापूर दरम्यान हॉटेल सुगरण जवळ येथील इथाईल ऍसिटेट या रसायनाची वाहतूक करणाऱ्या टँकर चालकाच्या झोपेच्या भरात दुभाजकाला धडकून टँकर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. महामार्गावर वाहनाच्या दुतर्फा रांगा लागल्याने पोलिसांनी सध्या वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली.