esakal | या "झेडपी'त मुख्यमंत्री ठाकरेंची एन्ट्री 
sakal

बोलून बातमी शोधा

या "झेडपी'त मुख्यमंत्री ठाकरेंची एन्ट्री 

नेत्यांना खूष ठेवण्याचा प्रयत्न 
जिल्हा परिषदेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या नेत्यांना खूष करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर आपल्या नेत्यांप्रती त्यांची असलेली निष्ठाही यानिमित्ताने दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होते. 

या "झेडपी'त मुख्यमंत्री ठाकरेंची एन्ट्री 

sakal_logo
By
संतोष सिरसट

सोलापूर ः जिल्हा परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्राची एन्ट्री झाली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी ठाकरे यांच्या छायाचित्रासह माजी आमदार नारायण पाटील यांचे छायाचित्रही आपल्या कार्यालयात लावले आहे. 

हेही वाचा ः "टीईटी'त एसईबीसी, ईडब्ल्यूएसच्या विद्यार्थ्यांना पाच टक्के गुणांची सूट 

जिल्हा परिषदेत सत्ता बदल झाला की विविध पदावर असलेले पदाधिकारी आपापल्या नेत्यांची छायाचित्रे आपल्या कार्यालयात लावतात. ही परंपरा तशी जुनीच आहे. ती जपण्याचा प्रयत्न सध्याच्या अध्यक्षांसह सर्वच पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसे पाहिले तर जिल्हा परिषदेत एका कोणत्याच पक्षाची सत्ता नाही. सत्ताधारी व विरोधकांना 50 टक्के संधी मिळाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत नेमकी सत्ता कोणाची हेच कळत नाही. करमाळ्याचे असलेले अध्यक्ष कांबळे हे माजी आमदार पाटील यांचे समर्थक आहेत. ते शिवसेनेच्या तिकिटावर जिल्हा परिषदेला निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी अध्यक्ष झाल्यानंतर एक-दोन महिन्यातच आपल्या कार्यालयात आपले नेते पाटील व राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांची छायाचित्रे लावली आहे. आपल्या नेत्यांची छायाचित्रे लावताना त्यांनी पूर्वीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजीमंत्री चंद्रकांत पाटील, सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख यांच्यासह इतर नेत्यांची छायाचित्रेही आहे तशीच ठेवली आहेत. जुनी छायाचित्रे न काढता आपल्या नेत्यांची छायाचित्रे लावणे त्यांनी पसंत केले आहे. 

हेही वाचा ः खासदार डॉ. महास्वामीच्या "अटकपूर्व'वर उद्या फैसला 

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण हे मंगळवेढ्याच्या आवताडे गटाचे आहेत. त्यामुळे त्यांनीही आपल्या कार्यालयात त्यांचे नेते समाधान आवताडे व बबनराव आवताडे यांची छायाचित्रे लावली आहेत. कृषी समितीचे सभापती अनिल मोटे हे सांगोला तालुक्‍यातील आहेत. मात्र, त्यांच्या दालनाचे काम सुरू असल्याने त्याठिकाणी अद्याप कोणतेही छायाचित्र लावले नाही. 
बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी पूर्वी असलेली खासदार शरद पवार, माजीमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री फडणवीस, माजीमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, माजी खासदार धनंजय महाडीक यांची छायाचित्रे कायम ठेवली आहेत. सलग दुसऱ्यांदा त्यांना ही समिती मिळाली आहे. समाजकल्याण समितीच्या सभापती संगीता धांडोरे या सांगोल्याच्या आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या कार्यालयात माजीमंत्री गणपतराव देशमुख यांचे छायाचित्र लावले होते. मात्र, श्री. देशमुख यांनी त्याला विरोध केल्याने त्यांचे छायाचित्र काढून ठेवल्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्वाती शटगार यांच्या कार्यालयात खासदार शरद पवार, सुशीलकुमार शिंदे व माजीमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची छायाचित्रे आहेत. 

loading image