Solapur Crime
Sakal
सोलापूर
Solapur Crime: 'बालकांना भीक मागायला लावणाऱ्या महिलेवर गुन्हा'; साेलापूर शहरातील चौकांत लहान मुले, महिला व पुरुषांना करतात उभे..
Maharashtra crime news child begging investigation: बालशोषणाच्या अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शहरातील चौकांमध्ये उभे असणाऱ्या अशा मुलांबाबत त्वरित माहिती द्यावी, असेही आवाहन करण्यात आले.
सोलापूर : शहरातील महावीर चौकात बालकांना भीक मागायला लावणाऱ्या महिलेविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात बाल न्याय अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी (ता. ४) सायंकाळी पाचच्या सुमारास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष व दामिनी पथकाने ही कारवाई केली. जैताबाई महादेव पवार (वय ४०, रा. पारधी वस्ती, आयटीआय, जुना विजापूर नाका, सोलापूर) असे तिचे नाव आहे. तर बालकांना बालगृहात हलविले आहे.

