

19-Year-Old Murdered in Solapur; Police Detain Four Including Minor
sakal
सोलापूर: येथील ताई चौक परिसरातील केंगनाळकर वीटभट्टी जवळील काटेरी झुडुपांत नेऊन चौघांनी प्रथमेश बबन गायके (वय १९, रा. ताई चौक, रवींद्रनगर, सोलापूर) याचा खून केला. एमआयडीसी पोलिसांत या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी चौघांनाही काही तासांतच पकडले. ते सगळेजण मृत प्रथमेशचे बालमित्र होते. त्यात एक अल्पवयीन आहे.