मामाच्या गावाला आलेल्या चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू

मामाच्या गावाला आलेल्या व बहीणीसोबत खेळायला गेलेल्या चार वर्षिय चिमुकल्याचा पाझर तलावात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना १२ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता एकुरके (ता. मोहोळ) शिवारात घडली.
Kunal More
Kunal MoreSakal
Updated on
Summary

मामाच्या गावाला आलेल्या व बहीणीसोबत खेळायला गेलेल्या चार वर्षिय चिमुकल्याचा पाझर तलावात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना १२ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता एकुरके (ता. मोहोळ) शिवारात घडली.

मोहोळ - मामाच्या गावाला आलेल्या व बहीणीसोबत खेळायला गेलेल्या चार वर्षिय चिमुकल्याचा (Child) पाझर तलावात (Lake) बुडाल्याने (Drown) त्याचा मृत्यू 9Death) झाल्याची घटना १२ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता एकुरके (ता. मोहोळ) शिवारात घडली. कुणाल कुंदन मोरे (रा.मोडनिंब, ता. माढा) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मोडनिंब (ता. माढा) येथील प्रियंका व कुंदन मोरे हे त्यांच्या दोन मुली व लहान मुलासह गेल्या एक महिन्यापासून एकुरके (ता. मोहोळ) येथे अरविंद भारत जौजंट यांच्याकडे कामानिमित्त आले आहेत. दरम्यान, १२ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता प्रियंका व कुंदन मोरे यांचा मुलगा कुणाल (वय ४ वर्षे) हा त्याची बहीण रेणुका हिच्यासह घराशेजारी असणाऱ्या पाझर तलावाजवळ खेळत होता. खेळत खेळत कुणाल पाण्यात गेल्यामुळे तो पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती रेणुका हिने धावत जाऊन मामा अरविंद जौजंट व आई प्रियंका मोरे यांना सांगितल्यानंतर त्यांनी तलावाकडे धाव घेत सर्वत्र शोधाशोध केली.

Kunal More
...तो तर दृष्टीदाता देवदूतच!

त्यावेळी चिमुकला कुणाल तलावाच्या पाण्यात तळाला गेल्याचे आढळून आले. त्याला बाहेर काढुन तात्काळ उपचारासाठी मोहोळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरानी घोषीत केले.

या प्रकरणी अरविंद भारत जौजंट (रा.एकुरके) यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसात अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पोलिस नाईक गणेश पोपळे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Drugs
sangola, shelakewadi zp school
A demand has been made to provide five new MSRTC buses to the Mangalwedha ST Depot to improve passenger services.
How will B-2 land regularization benefit Solapur?
Marathi News Esakal
www.esakal.com