
जगताप यांचे संचालक पद रद्द होणे हे बागल गटासाठी धक्का आहे.
बागल गटाचे चिंतामणी जगताप यांचे बाजार समिती संचालक पद रद्द
करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती चिंतामणी जगताप यांचे बाजार समितीचे संचालकपद रद्द करण्यात आल्याचा आदेश जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी दिला आहे.
चिंतामणी जगताप हे बागल गटाकडून बाजार समितीचे संचालक झाले आहेत. जगताप यांचे संचालक पद रद्द होणे हे बागल गटासाठी धक्का आहे. तर माजी आमदार जगताप गटात मात्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चिंतामणी जगताप यांच्याकडे करारान्वये बाजार समितीचा नोंदणीकृत भूखंड असून त्यांनी त्याचे भाडे देखील भरलेले नाही. सबब समितीशी प्रत्यक्ष करार व थकबाकीदार असल्याने त्यांना अपात्र घोषित करून बाजार समितीचे सदस्यत्व रद्द करणेबाबत जगताप गटाचे युवानेते शंभुराजे जयवंतराव जगताप यांनी जिल्हा उपनिबंधक सह. संस्था सोलापूर यांच्याकडे ॲड. कमलाकर वीर यांचेमार्फत अपील दाखल केले होते.
हेही वाचा: करमाळा शहर व तालुक्यात बंदला संमिश्र प्रतिसाद; दुपारी बारा नंतर सर्व व्यवहार सुरळीत
या अपीलावर लेखी व तोंडी युक्तिवाद, सुनावणी होवून जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी चिंतामणी जगताप यांना अपात्र घोषित करीत त्यांचे बाजार समिती सदस्यत्त्व रद्दबातत ठरविले आहे. चिंतामणी जगताप हे बाजार समिती संचालक असण्यासाठी अपात्र ठरत असल्याने त्यांना आदेशाच्या तारखेपासून म्हणजेच 21 ऑक्टोंबर 2021 पासून सदस्य पदावरून कमी करण्यात येत असले बाबत देखील आदेशात म्हटले आहे. या अपीलामध्ये अर्जदार शंभुराजे जयवंतराव जगताप यांच्या वतीने ॲड. कमलाकर वीर, चिंतामणी जगताप यांचे वतीने ॲड. राऊत व त्रयस्थ अर्जदार सभापती बंडगर यांच्या वतीने ॲड. दुरगुडे यांनी कामकाज पाहीले.
हेही वाचा: मांगी तलावात पाणी नसतानाच करमाळा MIDCला केले आरक्षित
ज्या दिवशी देशभक्त कै.नामदेवराव जगताप पुतळ्याचे अनावरण झाले. त्याच दिवशी आपले सर्वार्थ राजकीय हेतू फिटले, माजी सचिव शिंदे व इतर कर्मचारी यांनी बनवट दस्त तयार करून हे प्रकरण दाखल केले आहे. 1999 साली अंङरटेबल पैसे घेवून मला अधीग्रहीत झालेला प्लॉट दिल्या बद्दल फसवणुकीचा फौजदारी दावा दाखल करणार आहे. आम्ही राजकीय दबाव टाकायला कमी पडलो, ज्याईन्ट रजिस्टर पुणे यांच्याकङे दाद मागणार आहोत.
- चिंतामणी जगताप, करमाळा
Web Title: Chintamani Jagtap Of Bagal Group Has Been Removed From The Post Of Market Committee Director
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..