esakal | करमाळा शहर व तालुक्यात बंदला संमिश्र प्रतिसाद; दुपारी बारा नंतर सर्व व्यवहार सुरळीत | Maharashtra Ban
sakal

बोलून बातमी शोधा

Karmala City

करमाळा शहर व तालुक्यात बंदला संमिश्र प्रतिसाद; दुपारी बारा नंतर सर्व व्यवहार सुरळीत

sakal_logo
By
अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) - महाविकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला करमाळा तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांनी करमाळा शहरातील मेन रोडवरील व्यापार्यांना बंद ठेवण्याचे आवाहन केले. सकाळी काहीवेळ ठरावीक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली, दुपारी बारा वाजल्यानंतर मात्र सर्व व्यवहार सुरळीत सुरू होती.

करमाळा शहर व तालुक्यातील अनेक ठिकाणच्या शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आले. महाराष्ट्र बंदला करमाळा शहर व तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. करमाळा शहरासह तालुक्यातील केम, साडे ,जेऊर, कोर्ट, वीट, जिंती या भागातील सर्व व्यवहार सुरळीतपणे चालू होते. लखिमपूर येथील शेतकरी हत्येच्या निषेधार्थ करमाळा येथे महाविकास आघाडीकडून बंदचे आवाहन करण्यात आले.

हेही वाचा: पतीच्या निधनानंतर खचून न जाता केला मुलाला फौजदार!

लखीमपूर येथील घटनेचा निषेध करणारे निवेदन महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे ,शिवसेना तालुकाप्रमुख सुधाकर लावंड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादासाहेब लबडे, शिवसेना शहरप्रमुख प्रवीण कटारिया, राष्ट्रवादी कॉंग्रेस शहरप्रमुख शिवराज जगताप, नितीन झिंजाडे गौरव झांजुर्णे, शिवाजी जाधव, अशफाक जमादार, गणेश कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

लखीमपुर खिरी येथील शहीद शेतकरी आंदोलकांना काँग्रेस पक्षातर्फे वाहण्यात आली श्रद्धांजली

लखीमपुर खिरी येथील आंदोलक शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री मिश्रा यांच्या मुलाने गाडी खाली चिरडल्याने करमाळा येथे काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुनील सावंत यांच्या नेतृत्वाखाली लखिमपुर खिरी येते शहीद झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी सरपंच दत्तात्रय आडसूळ ,राष्ट्रवादीचे गोवर्धन चवरे,फारुख बेग यांची भाषणे झाली.

loading image
go to top