ख्रिश्चन आक्रमक! आमदार पडळकरांचे ख्रिश्चन धर्माबद्दल अवमानकारक वक्तव्य; मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा
Solapur: सरकारकडून याबाबत काहीच कार्यवाही होताना दिसत नसल्याने आषाढीनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखविणार असल्याचा इशारा भीमशक्ती संघटनेने दिला आहे.
MLA Padalkar Sparks Row with Remarks Against Christian ReligionSakal
सोलापूर : गेल्या आठवड्यात सांगली येथे हिंदू आक्रोश सभेमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्माबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे. आमदार पडळकर यांचे विधानसभा सदस्यत्व काढून घ्यावे, अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेने केली आहे.