esakal | डोन्ट वरी.. जीवनावश्यक, अत्यावश्यक सेवा मिळत राहणार
sakal

बोलून बातमी शोधा

Citizen information from police in Solapur

कोरोना विषाणूंचा संसर्ग व प्रसार जगभरात वेगाने होत आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांकरिता लॉकडाऊन जाहीर केले आहे. या कालावधीत जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होतील की नाही यासंदर्भात जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.

डोन्ट वरी.. जीवनावश्यक, अत्यावश्यक सेवा मिळत राहणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी, लॉकडाऊनच्या कालावधीत जीवनावश्यक, अत्यावश्यक सेवा मिळत राहणार आहेत. नागरिकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे. या संदर्भातील माहिती गस्तीवरील पोलिस ध्वनीक्षेपकावर देणार आहेत.  
कोरोना विषाणूंचा संसर्ग व प्रसार जगभरात वेगाने होत आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांकरिता लॉकडाऊन जाहीर केले आहे. या कालावधीत जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होतील की नाही यासंदर्भात जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. दूध, भाजीपाला, अंडी, किराणामाल, मांस, अन्नधान्य तसेच वीज, पाणीपुरवठा, दूरसंचार, अग्नीशमन, बँक, एटीएम, वैद्यकीय सेवा चालू असणार आहेत. नागरिकांनी भीती बाळगू नये, असे आवाहन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे. 
जनतेमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी, कर्मचार्‍यांनी गस्तीवर असलेल्या वाहनावरील ध्वनिक्षेपकावरून जीवनावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक सेवा संदर्भात जनतेला माहिती द्यावी असे आदेश दिले आहेत. दुध, अंडी, चिकन विक्रीची दुकाने, वाहतूक करणारी वाहने चालू राहतील. विनाकारण पोलिसांकडून अडथळा होणार नाही, याची दक्षता घ्यावी असेही आदेशात म्हटले आहे.

loading image