esakal | मोहोळ नगर परिषदेच्या कार्यालयात शहर शिवसेनेचे कचरा फेको आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Mohol Shivsena

गेल्या आठवडाभरापासूनच्या रिमझिम पावसामुळे शहरात मुख्य रस्त्याच्या आजूबाजूला सर्वत्र चिखल व दलदल निर्माण झाली आहे. वेळोवेळी सांगून, लेखी कळवूनही नगर परिषदेकडून कचरा उचलला जात नाही. गटारी तुंबल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून, दुर्गंधी पसरली आहे. सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचे सावट असल्याने साथीचे रोग पसरण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच आंदोलन करण्याची वेळ आली आहे, असे शिवसेनेचे शहराध्यक्ष श्री. देशमुख यांनी सांगितले. 

मोहोळ नगर परिषदेच्या कार्यालयात शहर शिवसेनेचे कचरा फेको आंदोलन

sakal_logo
By
राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ शहरात जागोजागी कचरा साचला आहे, स्वच्छता नाही, ठिकठिकाणी गटारी तुंबल्या आहेत या अडचणीच्या वेळोवेळी तक्रारी करूनही नगर परिषद प्रशासनाने दखल न घेतल्याच्या निषेधार्थ मोहोळ शहर शिवसेनेच्या वतीने शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कचरा फेको आंदोलन करण्यात आले. नगर परिषदेच्या नगराध्यक्षांच्या दालनाजवळ तसेच संपूर्ण पायऱ्यांवर कचरा फेकल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. 

हेही वाचा : पोलिस पती-पत्नीच्या पुढाकारातून युवकांचा स्पर्धा परीक्षा व पोलिस भरतीचा सराव 

गेल्या आठवडाभरापासूनच्या रिमझिम पावसामुळे शहरात मुख्य रस्त्याच्या आजूबाजूला सर्वत्र चिखल व दलदल निर्माण झाली आहे. वेळोवेळी सांगून, लेखी कळवूनही नगर परिषदेकडून कचरा उचलला जात नाही. गटारी तुंबल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून, दुर्गंधी पसरली आहे. सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचे सावट असल्याने साथीचे रोग पसरण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच आंदोलन करण्याची वेळ आली आहे, असे शिवसेनेचे शहराध्यक्ष श्री. देशमुख यांनी सांगितले. या आंदोलनात चंद्रकांत गोडसे, जयपाल पवार, गणेश क्षीरसागर, किरण पोफळकर, शाहू बरकडे, सुलतान इनामदार, प्रवीण दाइंगडे, अमीर शेख, राजाभाऊ गुंड यांनी सहभाग नोंदविला. 

हेही वाचा : मनालीच्या ऑनलाइन इको-फ्रेंडली बाप्पाच्या कार्यशाळेस राज्यातून प्रतिसाद; 700 जणांनी बनवल्या मूर्ती 

याबाबत मोहोळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी के. एन. पाटील म्हणाले, मोहोळ शहराची मोठ्या प्रमाणात हद्दवाढ झाली आहे. जास्तीत जास्त स्वच्छता करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कायम कर्मचारी नाहीत. नगर परिषद नवीन आहे. तरी जे नागरिक फोन करून अडचणी कळवितात, फोटो पाठवतात, व्हिडिओ पाठवतात त्या ठिकाणी तातडीने कर्मचारी पाठवून स्वच्छता केली जात आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top