
सोलापूर : महापालिकेची स्वच्छता मोहीम ५.० अंतर्गत शहरात असलेल्या स्मशानभूमीमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी एकूण कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ५ स्मशानभूमीची स्वच्छता करण्यात आली. आज एकूण १८ टन कचरा संकलित करण्यात आला. यामुळे स्मशानभूमींचा परिसर चकाचक झाला.