
सोलापूर : शहरातील भाजी मंडई, बस स्थानक यासह अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचून आहेत. पावसामुळे काही ठिकाणी कचरा कुजून दुर्गंधी सुटत आहे. तुलनेने हुतात्मा आणि खंदक बागेत नियमित स्वच्छतेची व्यवस्था आहे. असे असताना महापालिका प्रशासन स्वच्छता महाअभियानाची शोबाजी करण्यात धन्यता मानत आहे. परिणामी, कचरा व्यवस्थापनाची घडी विस्कटत असल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले.