
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा पुरविण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी सर्वच जाती-धर्मातील गोरगरीब कुटुंबांना निवारा देण्यासाठी सरसकट सगळ्यांसाठी पंतप्रधान आवास योजना सुरू केली. त्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी ३० लाख घरांना मंजुरी देण्यात आली. एक महिन्यापूर्वी १५ लाख कुटुंबांना घरे देण्यात आली. येत्या दोन वर्षात ३० लाख घरांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.