
Shripur Event: Full-Size Statue of Sudhakar Pant Unveiled by CM Devendra Fadnavis
Sakal
श्रीपूर : सुधाकरपंत परिचारक यांनी आपल्या कर्माने, नेतृत्वाने मोठेपण सिद्ध केले होते. लोक त्यांना आदराने मालक म्हणत असले तरी, त्यांचा भाव सेवेकऱ्याचा होता. अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकीय इमारती समोर सुधाकरपंत परिचारक यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सभेत मुख्यमंत्री बोलत होते.