मी २४ तास जनतेसाठी काम करणारा मुख्यमंत्री - एकनाथ शिंदे

राज्यातील नवं सरकार हे जनतेचं आणि सर्वसामान्यांचं आहे - मुख्यमंत्री शिंदे
Eknath Shinde
Eknath Shindeesakal
Updated on
Summary

राज्यातील नवं सरकार हे जनतेचं आणि सर्वसामान्यांचं आहे - मुख्यमंत्री शिंदे

राज्यातील नवं सरकार हे जनतेचं आणि सर्वसामान्यांचं आहे. आपल्या राज्यातील अनेक लोकांमध्ये बुद्धिमत्तेचे प्रमाण अधिक आहे. याचा उपयोग आपण राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी करु, असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. आज ते पंढरपुरात जनतेशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी पंढरपूरच्या विकास आराखड्यासंदर्भात भाष्य केलं. पंढरपूरचा विशेष विकास आराखडा बनवणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिलं आहे.

Eknath Shinde
अमरनाथ दुर्घटनेत सांगलीतील 5 जण बचावले, भाविकांचा नातेवाइकांशी संपर्क

यावेळी ते म्हणाले की, मी २४ तास जनतेसाठी काम करणारा मुख्यमंत्री आहे. महाराष्ट्रातील जनतेचा सेवक असल्याच्या भावनेनं मला हे काम करायच आहे. त्यामुळे या कामात मला जनतेची मदत लागणार आहे, तुम्ही ती कराल असा विश्वासही आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

पुढे ते म्हणाले की, सरकारची प्रतिमा वाढली पाहिजे. शासना आणि प्रशासन ही रथाची दोन चाके असल्याने ती समान वेगाने धावायला हवीत. दोन्ही चाके गतीने धावली तरच राज्याच्या विकासालाही गती येईल. पंढरपुर हे आपल्यासारख्या गोरगरिबांचे दैवत आहे. १० लाखांपेक्षा अधिक लोक दिसत आहेत. या वारकऱ्यांसाठी स्वच्छ निरोगी वातावरण असलं पाहिजे. त्यासाठी पंढरपूरच्या विकासासाठी एक विशेष विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे भविष्यात या तीर्थक्षेत्र सर्व सोयीनियुक्त असेल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

Eknath Shinde
मुंबईत पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी - IMD

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The project is expected to improve irrigation, drinking water supply and water storage in Solapur, Satara and Pune districts.
The protesters warned of an agitation if their demands regarding smart meters and power supply issues are not addressed within eight days.
Protesters demanded an impartial inquiry into the NEET paper leak and the alleged police action on students while seeking accountability from the Union Education Minister.
Protesters submitted a memorandum demanding an impartial inquiry into the alleged police action against student protesters and action on their demands.
Marathi News Esakal
www.esakal.com