mumbai rain update
mumbai rain update

मुंबईत पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी - IMD

BMC ने आदेशाद्वारे नागरिकांना समुद्र किनाऱ्यावर जाण्यास मनाई केली आहे.
Summary

BMC ने आदेशाद्वारे नागरिकांना समुद्र किनाऱ्यावर जाण्यास मनाई केली आहे.

अखंड जून महिना पावसाशिवाय कोरडा गेला. मात्र आता पावसाने जूनची कसर जुलै महिन्यात भरून काढली असल्याचे चित्र आहे. मागील आठवड्यापासून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. सुरुवातीला भारतीय हवामान खात्याच्या अंदाजनुसार पाऊस झाला नाही. परंतु आता राज्यासह देशातील अनेक भागांना पावसाने झोडपून काढले आहे.

राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबईसह इतर भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्यानं चार दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पाच दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. दरम्यान, आता पुन्हा एकदा हवामान खात्यानं मुंबईत पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. अत्यावश्यक कामांसाठी घरातून बाहेर पडण्यास सांगितले आहे.

mumbai rain update
पांडुरंगाची अचानक बंद पडलेली शासकीय पूजा पुन्हा कशी सुरू झाली?

पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, येत्या पाच दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यातील मुंबईसह कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना गेल्या 24 तासात पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. शनिवारी मुंबईत 'रेड' अलर्ट जारी केला होता. मात्र मुंबईत केवळ 2.2 मिमी पावसाची नोंद झाली असून ही दिलासादायक बातमी आहे.

महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांतील 130 गावांमध्ये संततधार पाऊस सुरू आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील गडचिरोली, हिंगोली आणि नांदेड या तीन जिल्ह्यात गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. या जिल्ह्यातील काही नद्यांना पूर आल्याने आतापर्यंत 200 हून अधित लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

mumbai rain update
प्रसाद लाड यांच्या घराबाहेर सापडली पैशाने भरलेली बॅग, अज्ञाताचे कृत्य

दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आदेशाद्वारे नागरिकांना समुद्र किनाऱ्यावर जाण्यास मनाई केली आहे. बीएमसी कमिशनर इक्बाल सिंग चहल यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, शहरातील समुद्रकिनाऱ्यांना सकाळी 6 ते सकाळी 10 या वेळेतच भेट देता येणार आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त मुसळधार पावसाचा परिणाम दक्षिणेकडील तेलंगणा राज्यावर झाला आहे. येथील अनेक रस्ते पाण्याखाली असल्याने वाहतूकीसाठी बंद झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com