
याबाबतचे पत्र नुकतेच नगर पालिकेला प्राप्त झाले.
मुख्यमंत्री पावले अन् मंगळवेढा नगरपालिकेला 5 कोटी दिले
मंगळवेढा (सोलापूर): नगरपालिकेच्या टाऊन हॉलसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून पाच कोटी रुपयांचा निधी (Fund) मंजूर केला. याबाबतचे पत्र नुकतेच नगर पालिकेला (Mangalwedha municipality) प्राप्त झाले. नगराध्यक्षांनी गत निवडणुकीपूर्वी दिलेल्या जाहीरनाम्यातील शेवटच्या कामाला कोट्यवधी रुपयांची तरतूद झाल्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कामास मंजुरी ही निर्णायक ठरली.
हेही वाचा: मंगळवेढा पालिकेचा दिल्लीत गौरव! कचरामुक्त शहराचा पुरस्कार प्रदान
शहरातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आठवडा बाजाराच्या शेजारील जागेत असलेले टाऊन हॉल (Town hall) इमारत धोकदायक झाल्यामुळे नगरपालिकेने नवीन इमारत बांधण्याबाबतचा सात कोटीचा प्रस्ताव शासनाला तीन वर्षांपूर्वी सादर केला. हा प्रस्ताव गेली तीन वर्षे प्रलंबित होता. त्यामुळे शहरातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमावर मर्यादा आल्या. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारा दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) त्यांना नगराध्यक्ष अरुणा माळी यांनी प्रलंबित कामाबाबत आठवण केली. त्यांनी या कामास निधी देण्याबाबत असा शब्द दिला होता. शिवाय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना सोलापूर दौऱ्यात निधी देण्याबाबत मागणी केली. त्याप्रमाणे निधी मंजुरी बाबतचा शासन निर्णय नुकताच आला. या बाबत नगरपालिकेदेखील या संदर्भातील पत्र प्राप्त झाले.
हेही वाचा: मंगळवेढा उपसासिंचन योजनेच्या दोन टीएमसी पाण्यास शासनाची मंजुरी
सदरच्या प्रलंबित कामासाठी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, भगीरथ भालके, राहुल शहा, लतीफ तांबोळी, रामेश्वर मासाळ, पी बी पाटील, अरुण किल्लेदार, चंद्रशेखर कौडूभैरी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, पक्ष नेते अजित जगताप, प्रवीण खवतोडे, भागीरथी नागणे, संकेत खटके यांच्याबरोबर नगरपालिकेचे नगरसेवक व प्रशासनानी सहकार्य केले. या नव्या कामामुळे शहरातील विविध सांस्कृतिक कार्यक्रम व कलाकार व साहित्यिकाला एक चांगल्या प्रकारचे व्यासपीठ यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधी रुपयांच्या निधीची मंजुरी मिळाल्यामुळे त्याचा लाभ आगामी निवडणुकीत महा विकास आघाडीला होणार आहे
जाहीरनाम्यात दिल्याप्रमाणे या कामाला 5 कोटीच्या निधीस मंजुरी महाविकास आघाडी सरकारने दिल्यामुळे शहराच्या सौंदर्यात या कामामुळे भर पडणार आहे. शिवाय हे अद्यायावत टाऊन हॉल माफक दरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपलब्ध होणार आहे.
- अरूणा माळी, नगराध्यक्ष
Web Title: Cm Uddhav Thackeray Has Sanctioned A Fund Of Rs 5 Crore For The Town Hall Of Mangalwedha Municipality
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..