मंगळवेढा पालिकेचा दिल्लीत गौरव! कचरामुक्त शहराचा पुरस्कार प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंगळवेढा पालिकेचा दिल्लीत गौरव

राज्यातील 69 नगरपालिकेचा यावेळी गौरव करण्यात आला.

मंगळवेढा पालिकेचा दिल्लीत गौरव! कचरामुक्त शहराचा पुरस्कार प्रदान

मंगळवेढा (सोलापूर) : जिल्ह्यातून एकमेव पात्र झालेल्या मंगळवेढा नगरपालिकेचा कचरा मुक्त शहर म्हणून नगराध्यक्षा अरुणा माळी व मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांचा नवी दिल्लीत गौरव करण्यात आला.

राज्यातील 69 नगरपालिकेचा यावेळी गौरव करण्यात आला. मंगळवेढा नगरपालिकेला 33 वे स्थान मिळाले. हा पुरस्कार केंद्रीय नागरी सचिव दुर्गाशंकर मिश्रा, केंद्रीय स्वच्छता अभियान संचालक रूपा मिश्रा यांच्या हस्ते नगराध्यक्ष अरुणा माळी मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव सोमनाथ माळी यांनी स्विकारला. नगरपरिषदेने स्वच्छ सर्व्हेक्षण 2018 मध्ये 19 वा तर स्वच्छ सर्व्हेक्षण 2019 मध्ये राज्यात कचरा मुक्‍त शहर म्हणून 41 वा क्रमांक मिळाल्यामुळे नगरपरिषदेचा नावलौकीक राज्यात झाला आहे.

हेही वाचा: पाहा मंगळवेढा तालुक्‍यातील पौराणिक आणि ऐतिहासिक स्थळांचा नजारा !

शहरामध्ये 21 सार्वजनिक शौचालय असून 2347 वैयक्तिक शौचालय आहेत. त्यामधील काही लाभार्थ्यांना शासनाकडून अनुदान मिळवून दिले आहे. शौचालयाचे दररोज स्वच्छता व निर्जंतुकीकरण केले जाते. औषध फवारणी केल्यामुळे डासांचे प्रमाण रोखण्यास मदत झाली. ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी प्रक्रिया पालिकेने राबवली. ओल्या कचऱ्याचे तुकडे करून निर्मिती केलेले खत माफक दरात शहरातील नागरिकांसाठी उपलब्ध केले. सुक्‍या कचऱ्यामध्ये प्लास्टिकचे आयुष्य जास्त असल्यामुळे जमिनीचे नुकसान होते म्हणून प्लास्टिक वेगळे करून त्याचे गट्टे बांधले जातात. ते औरंगाबाद व सांगली येथील कंपनीला पुढील प्रक्रियेसाठी विक्री केली जाते. या कचऱ्यापासून पालिकेला अल्पशा उत्पन्न प्राप्त झाले आहे. मागील चार वर्षांमध्ये राज्यातील सत्ता आणि नगरपालिका सत्ता परस्परविरोधी असताना देखील प्राप्त निधीतून शहराच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केली.

हेही वाचा: कचरामुक्त शहर मंगळवेढा! राष्ट्रपतींच्या हस्ते 20 नोव्हेंबरला सन्मान

शहरांतील नागरीक, विविध मंडळ, संस्था यांचे सहकार्याने स्वच्छसर्वेक्षणअभियानांत सातत्य राखल्यामुळे विकास कामासाठी कोट्यावधीचा निधी मिळाला. नियोजनबध्द केलेले कामकाज व कर्मचा-यांनी घेतलेले परिश्रम, सर्व नगरसेवकांचे सहकार्य यामुळेच सदरचा मान सन्मान व रोख स्वरुपाच्या बक्षीसामधून शहरांतील स्वच्छतेची कामे व नागरीकांना चांगल्या सुविधा देण्यास मदत झाली. पालिकेचा दिल्लीत नावलौकिक करण्याची दुसऱ्यांदा संधी माझ्या कारकिर्दीत मिळाली.

- अरुणा माळी, नगराध्यक्ष मंगळवेढा

loading image
go to top