जिल्हाधिकारी अजूनही वापरता मास्क! लसीकरणामुळे चौथ्या लाटेची शक्यता कमीच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona
जिल्हाधिकारी अजूनही वापरता मास्क! लसीकरणामुळे चौथ्या लाटेची शक्यता कमीच

जिल्हाधिकारी अजूनही वापरता मास्क! लसीकरणामुळे चौथ्या लाटेची शक्यता कमीच

सोलापूर : जिल्ह्यात सध्या बार्शी ग्रामीणमध्ये एक तर शहरात एक कोरोनाचा रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या जिल्ह्यातील १२ वर्षांवरील सर्वांचेच लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत ३२ लाख २६ हजार जणांनी पहिला तर २३ लाख ५६ हजार जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. चौथ्या लाटेची शक्यता धूसरच असून प्रतिबंधित लसीकरणामुळे कोरोनाचा फारसा धोका नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. सध्या राज्यात कोरोनाचे एक हजार ५२६ रुग्ण असून सातारा, सांगली, नंदूरबार, जालना, लातूर, हिंगोली, अकोला, बुलढाणा, भंडारा, गोंदिया हे जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत.

हेही वाचा: विद्यापीठाची सत्र परीक्षा ऑफलाईनच! दररोज दोन पेपर, जाणून घ्या वेळापत्रक

कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये आतापर्यंत शहर-ग्रामीणमध्ये दोन लाख १९ हजार ७३१ जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यात एक लाख ३१ हजार १५५ पुरुष तर ९२ हजार ५७६ महिलांचा समावेश आहे. त्यापैकी शहरातील एक हजार ५०५ तर ग्रामीणमधील दोन हजार ४२० पुरुष आणि एक हजार ३०६ महिलांचा कोरोनाने बळी घेतला. उर्वरित सर्व रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, शहरात मागील ४० दिवसांत केवळ एक रुग्ण आढळला आहे. तर ग्रामीणमधील रुग्णसंख्या कमी होऊन बार्शी वगळता सर्व तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. अक्कलकोट तालुका लसीकरणात आघाडीवर आहे. १८ वर्षांवरील जवळपास सर्वांनीच लसीचा किमान एकतरी डोस टोचला आहे. आता दोन्ही डोस घेऊन ज्यांना नऊ महिने पूर्ण झाले आहेत, त्यांना संरक्षित डोस (बूस्टर) दिला जात आहे. १८ वर्षांवरील सर्वांना कोविशिल्ड व कोवॅक्सिन तर १२ ते १७ वयोगटातील मुलांना कोर्बोवॅक्स लस दिली जात आहे.

हेही वाचा: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर लालपरी रुळावर! दीड महिन्यातच ५२१ कोटींची कमाई

लसीकरणाची स्थिती...
१८ वर्षांवरील व्यक्ती
३४,१४,४००
१५ ते १७ वयोगटातील मुले
२,२६,४१२
१२ ते १५ वयोगटातील मुले
२,४२,५६६
पहिला डोस घेतलेले
३२,२६,०२६
दोन्ही डोस घेतलेले
२३,५५,६६३

हेही वाचा: गड्या आपली मराठी शाळाच बरी! झेडपी,महापालिका शाळांचा वाढली पटसंख्या

जिल्हाधिकारी अजूनही वापरतात मास्क
सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याचे संपूर्ण नियोजन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. ते काम करताना त्यांनाही दोनवेळा कोरोनाची बाधा झाली. त्यांच्या नियोजनाला यश आले आणि जिल्हा कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहे. तरीही, ते अजून मास्क वापरतात. त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनाही मास्क वापरा, असे आवाहन केले आहे. आणखी काही दिवस नागरिकांनी नियम पाळल्यास निश्चितपणे कोरोनापासून जिल्हा मुक्त होईल, असा त्यामागील हेतू आहे.

Web Title: Collector Still Uses The Mask Lack At Possibility Of Fourth Wave Due To

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top