
विद्यापीठाची सत्र परीक्षा ऑफलाईनच! दररोज दोन पेपर, जाणून घ्या वेळापत्रक
सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन घेतल्या जातील. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, १५ जून ते ३१ जुलैपर्यंत परीक्षा संपविण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. अंतिम नियोजनासाठी मंगळवारी (ता. १७) सर्व अधिष्ठातांची (बोर्ड ऑफ एक्झामिनेशन) बैठक होणार आहे.
हेही वाचा: महापालिका निवडणुकीसाठी महाआघाडीचा ४०: ४० :३३ फॉर्म्युला
कोरोनामुळे तीन परीक्षा ऑनलाइन घेण्यात आल्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर, सर्व व्यवहार सुरळीत झाल्यानंतरही परीक्षा ऑनलाइनच घ्याव्यात, अशी काही विद्यार्थ्यांची मागणी आहे. परंतु, ऑनलाइनपेक्षा ऑफलाइन परीक्षेतच विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध होते. पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात बाहेर पडणाऱ्या मुलांना कोणतीही अडचण येणार नाही, यादृष्टीने विद्यापीठ प्रशासन आगामी सत्र परीक्षा ऑफलाइन घेण्यावर ठाम आहे. फेब्रुवारीपासून विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिकविले जात असून कॉलेज सध्या ऑफलाइन सुरू आहेत. त्यामुळे परीक्षा ऑनलाइन नकोच, असे अधिकाऱ्यांचे मत आहे. ऑनलाइनमुळे विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाल्याने प्रत्येक पेपरसाठी मुलांना १५ मिनिटांचा वेळ वाढवून दिला जाणार आहे. ज्या शाखेतील विद्यार्थ्यांची अडचण आहे, त्यांची परीक्षा शेवटी घेता येईल, असाही मतप्रवाह आहे. पण, परीक्षा ऑफलाइनच होणार, यावर प्रशासन ठाम असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा: विवाहानंतर शिक्षण घेऊन परिचारिका झालेल्या ‘ती’ने मुलाला बनविले डॉक्टर
ठळक बाबी...
- फेब्रुवारीपासून कॉलेज ऑफलाइन, वसतिगृहेही खुली
- पुणे विद्यापीठाची परीक्षा ऑफलाइनच, विद्यार्थ्यांची क्षमता सिद्धतेसाठी तोच पर्याय उत्तम
- विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी मिळणार १५ मिनिटांचा वाढीव वेळ
- दररोज दोन पेपर होतील, पहिला पेपर ९ ते १२.३० तर दुसरा पेपर १ ते ४.३० पर्यंत होईल
- १५ जून ते ३१ जुलै किंवा ५ ऑगस्टपर्यंत संपेल सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा
हेही वाचा: पुनम, प्रियंकाने बनविला रोबोट! माणसांप्रमाणे रोबोट तोडतो टोमॅटो
ऑफलाइन प्रश्नपत्रिकांची तयारी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने कोरोना काळात अन्य विद्यापीठांच्या तुलनेत परीक्षांचे नियोजन अतिशय उत्तम केले होते. सर्व विद्यापीठांच्या तुलनेत परीक्षा व निकाल वेळेत जाहीर केले. आता कोरोना कमी झाला असून अक्कलकोट, करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, पंढरपूर, सांगोला व दक्षिण सोलापूर हे तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. बार्शी तालुक्यात केवळ एक रुग्ण आहे. त्यामुळे विद्यापीठाने आगामी सत्र परीक्षांच्या प्रश्नपत्रिका ऑफलाइन तयार केल्या आहेत. त्यामुळे परीक्षा ऑफलाइन होणार, हे निश्चित झाले आहे.
Web Title: University Session Exam Is Offline Only Two Papers Per Day Know The
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..