esakal | दिलासादायकः बार्शीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले, 1875 पैकी 1631 झाले कोरोनामुक्त 
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

शहरातील 53 व ग्रामीणमधील 13 असे 66 अहवाल प्राप्त झाले. यामध्ये शहरातील 13 व ग्रामीणमधील 7 असे 20 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. शहरातील 38 तर ग्रामीणमधील 43 अशा 81 जणांचा आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंगळवारी झालेल्या मृतांमध्ये शहर व ग्रामीणमधील प्रत्येकी एक जण आहे. शहरातील 40 व ग्रामीणमधील 6 असे 46 जण निगेटिव्ह आढळले आहेत. शहरात 1 हजार 175 तर ग्रामीणमध्ये 780 असे एकूण 1 हजार 875जण कोरोनाबाधित आहेत. आज शहरातील नागणे प्लॉट, कासारवाडी रोड, आगळगाव रोड, सिध्देश्वर नगर, सनगर गल्ली, चाटे गल्ली, भीमनगर, जैन मंदिर जवळ येथे प्रत्येकी एक जण तर मंगळवार पेठ 3, अलिपूर रोड 2 असे 13 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. 

दिलासादायकः बार्शीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले, 1875 पैकी 1631 झाले कोरोनामुक्त 

sakal_logo
By
प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : बार्शी शहर अन्‌ तालुक्‍यातील मंगळवारी प्राप्त झालेल्या 66 तपासणी अहवालामध्ये 20 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. तालुक्‍यात 1875 बाधित रुग्णांपैकी 1631 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती तहसीलदार डी.बी.कुंभार यांनी दिली. बार्शी तालुक्‍यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने दिलासा मिळाला आहे. 

हेही वाचाः कोरोनामुळे गणेशोत्सवात मंडप कॉंट्रॅक्‍टर्स व पूरक व्यावासायिकांची कोट्यावधींची उलाढाल ठप्प 

शहरातील 53 व ग्रामीणमधील 13 असे 66 अहवाल प्राप्त झाले. यामध्ये शहरातील 13 व ग्रामीणमधील 7 असे 20 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. शहरातील 38 तर ग्रामीणमधील 43 अशा 81 जणांचा आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंगळवारी झालेल्या मृतांमध्ये शहर व ग्रामीणमधील प्रत्येकी एक जण आहे. शहरातील 40 व ग्रामीणमधील 6 असे 46 जण निगेटिव्ह आढळले आहेत. शहरात 1 हजार 175 तर ग्रामीणमध्ये 780 असे एकूण 1 हजार 875जण कोरोनाबाधित आहेत. आज शहरातील नागणे प्लॉट, कासारवाडी रोड, आगळगाव रोड, सिध्देश्वर नगर, सनगर गल्ली, चाटे गल्ली, भीमनगर, जैन मंदिर जवळ येथे प्रत्येकी एक जण तर मंगळवार पेठ 3, अलिपूर रोड 2 असे 13 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. 

हेही वाचाः विघ्न कोरोनाचे! या शहरातील 900 तर ग्रामीण मधील इतक्‍या मंडळींनी केली नाही श्री ची प्रतिष्ठापना 

ग्रामीण भागातील वैराग, उक्कडगाव, सौंदरे येथील प्रत्येकी एक जण तर उपळे दुमाला व बावी (आ) येथील प्रत्येकी दोन जण असे 7 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. शहरातील 137 व ग्रामीण भागातील 26 अशा 163 जणांवर उपचार सुरु आहेत. तर आत्तापर्यंत 1 हजार 631 जण उपचार होऊन बरे होऊन गेले आहेत. यामध्ये शहरातील 940 तर ग्रामीण भागातील 691 जण आहेत. 54 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती कुंभार यांनी दिली.  

संपादनः प्रकाश सनपूरकर 

loading image
go to top