
सोलापूर : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी विकसित केलेल्या डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये, लिक्विड ऑक्सिजन, ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर आणि जंबो ऑक्सिजन सिलेंडरचा तत्काळ व सतत पुरवठा व्हावा म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी समितीची स्थापना केली आहे. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक बी.टी. यशवंते यांची समितीचे समन्वय अधिकारी आहेत.
समितीमध्ये औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्यचे उपसंचालक प्रमोद सुरसे, अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त नामदेव भालेराव आणि एमआयडीसीचे क्षेत्रीय अधिकारी शिवाजी राठोड यांचा समावेश आहे. जिल्ह्यात व शहरात शासकीय रूग्णालये, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आणि डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये अत्यवस्थ कोरोना रूग्ण आणि संशयित अत्यवस्थ रूग्णांना आयसीयु, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची सोय करण्यात आली आहे. याठिकाणी लिक्विड ऑक्सिजन, ड्युरा ऑक्सिजन आणि जंबो ऑक्सिजन सिलेंडरची तत्काळ, सतत आणि अधिक क्षमतेने पुरवठा होण्यासाठी समिती काम करेल.
ऑक्सिजनच्या उपलब्धेसाठी आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे
ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या यंत्रणेशी संपर्क ठेवून ऑक्सिजनचा पुरवठा सुरळित करणे, आवश्यकता भासल्यास इतर जिल्ह्यातील आणि राज्यातील ऑक्सिजन पुरवठादार यांच्याशी संपर्क ठेवून ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी या समितीवर आहे. ऑक्सिजनच्या उपलब्धेसाठी आर्थिक अंदाजपत्रकही ही समिती तयार करणार आहे. ऑक्सिजन वितरकाशी समन्वय साधून नियमित पुरवठा होण्यासाठी प्रयत्न करणे, जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णालये आणि उपजिल्हा रूग्णालयात ऑक्सिजन लाईन बसविण्यासाठी समन्वय करणे, सिव्हिल हॉस्पिटलला लिक्विड ऑक्सिजन बसवणे आणि इतर दवाखान्यांना त्याचा पुरवठा याबाबत समन्वय ही समिती साधणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.