esakal | मोहोळ : भाजप नेते संजय क्षीरसागर यांच्या विरोधातील तक्रार निकालात
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Shirsagar

मोहोळ : भाजप नेते संजय क्षीरसागर यांच्या विरोधातील तक्रार निकालात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मोहोळ (सोलापूर) - मोहोळ येथील भाजप नेते संजय क्षिरसागर यांच्या विरोधात जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सोनवणे यांनी दाखल केलेली तक्रार जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने 9 सप्टेंबर रोजी निकालात काढली. त्यामुळे संजय क्षिरसागर यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान जिल्हा जात पडताळणी समितीने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करणार असल्याचे शिवाजी सोनवणे यांनी सांगितले.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, मोहोळ येथील भाजप नेते संजय क्षिरसागर यांनी तहसीलदार मोहोळ यांचे कडून दाखला मिळालेला असताना उपविभागीय अधिकारी सोलापूर यांचे कडून दुसरा जातीचा दाखला मिळवला आहे. पूर्वीचा जातीचा दाखला रद्द झाल्याची माहिती पडताळणी समिती न देता माहिती लपवून दूसरा जातीचा दाखला व वैधता प्रमाणपत्र बेकायदेशीरपणे मिळविल्याची तक्रार करत जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सोनवणे यांनी 24 मे 2021 रोजी संजय क्षीरसागर यांचा जातीचा दाखला जप्त करण्याची मागणी जिल्हा जात पडताळणी समितीकडे केली होती.

हेही वाचा: वर्षानंतरही शेतकऱ्यांना मिळेना भरपाई! 4246 शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

या संदर्भात जातपडताळणी समितीकडे सुनावणी सुरु होती. सुनावणी दरम्यान तक्रारदार शिवाजी सोनवणे यांनी आपली बाजू मांडली होती. मात्र पडताळणी समितीने यापूर्वी एका प्रकरणात संजय क्षिरसागर यांना जात वैधता प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे "महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास वर्ग अधिनियम 2000 चे कलम 7 (2) नुसार समितीने घेतलेला निर्णय अंतिम असून त्यास भारतीय संविधानातील कलम 226 अन्वये उच्च न्यायालयात याचिकेद्वारे दाद मागता येते अशी तरतूद आहे. त्यामुळे समितीने घेतलेल्या निर्णयांमध्ये पुनर्विलोकनाची तरतूद नसून तसे समितीस अधिकार नाहीत" असे निरीक्षण नोंदवत, जिल्हा जात पडताळणी समितीने तक्रारदार शिवाजी सोनवणे यांचा तक्रारी अर्ज 9 सप्टेंबर रोजी निकालात काढला. या आदेशामुळे संजय क्षिरसागर यांना पडताळणी समितीकडून दिलासा मिळाला आहे. तर शिवाजी सोनवणे यांना मुंबई उच्च न्यायालयात दाद मागावी लागणार आहे.

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिलेल्या आदेशाचा आम्ही आदर करतो. जिल्हा जात पडताळणी समितीने दिलेल्या आदेशाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.

- शिवाजी सोनवणे, तक्रारदार

सोमेश क्षीरसागर, अनिकेत क्षीरसागर, राहुल क्षीरसागर आणि संजना क्षीरसागर यांच्या विरोधात देखील शिवाजी सोनवणे यांनी या पुर्वी तक्रार दाखल केली होती. ती ही तक्रार जिल्हा जात पडताळणी समितीने यापूर्वीच निकालात काढली आहे. सध्या मोहोळ शहरात नगरपरिषद निवडणुकीची चाहुल लागली आले ,त्या पार्श्वभूमीवर या निकालाला विषेश महत्व प्राप्त झाले आहे.

माझ्या जातीच्या संदर्भात शिवाजी सोनवणे आणि गौरव खरात यांनी तक्रार दाखल केली होती. पडताळणी समितीला मी माझ्या आजोबा पणजोबाचे पुरावे दिल्याने समितीने यापूर्वीच मला वैधता प्रमाणपत्र दिले आहे. 9 सप्टेंबर रोजी समितीने दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो.

- संजय क्षीरसागर, भाजप नेते, मोहोळ

loading image
go to top