esakal | ब्रेकिंग !"या' समितीतून ढोबळेंना हाकलण्यासाठी विद्यापीठाकडे तक्रारी
sakal

बोलून बातमी शोधा

Dhoble

सोलापूर विद्यापीठाचे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर असे नामकरण करण्यात आले. तत्पूर्वी, नामांतरासाठी मोठा संघर्ष लढा उभारण्यात आला होता. त्यामध्ये माजी आमदार प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर, नगरसेवक चेतन नरोटे, अर्जुन सलगर, प्रा. शिवाजीराव बंडगर, रामचंद्र खांडेकर, पवन पाटील, शेखर बंगाळे आदींचा समावेश होता. त्याच वेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी कोणतीही भूमिका न घेता या लढ्यास विरोध दर्शविला. 

ब्रेकिंग !"या' समितीतून ढोबळेंना हाकलण्यासाठी विद्यापीठाकडे तक्रारी

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर विद्यापीठात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आश्‍वारूढ स्मारक उभारले जाणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने स्मारक समिती तयार केली असून, त्यात माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यापीठ नामांतर लढ्यास विरोध करणाऱ्या ढोबळे यांना समितीतून काढून टाकावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने विद्यापीठाकडे तीन तक्रारी अर्ज प्राप्त झाले असून त्यावर विद्यापीठ प्रशासन अंतिम निर्णय घेणार आहे. 

हेही वाचा : अकरावी विज्ञानाचा कट ऑफ 93.80 टक्के! वाणिज्य, कला शाखेसाठी कट ऑफ आहे "इतका' 

सोलापूर विद्यापीठाचे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर असे नामकरण करण्यात आले. तत्पूर्वी, नामांतरासाठी मोठा संघर्ष लढा उभारण्यात आला होता. त्यामध्ये माजी आमदार प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर, नगरसेवक चेतन नरोटे, अर्जुन सलगर, प्रा. शिवाजीराव बंडगर, रामचंद्र खांडेकर, पवन पाटील, शेखर बंगाळे आदींचा समावेश होता. त्याच वेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी कोणतीही भूमिका न घेता या लढ्यास विरोध दर्शविला. तरीही त्यांना स्मारक समितीत का घेतले, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. विद्यापीठाने ढोबळेंना स्मारक समितीतून काढून टाकावे, अन्यथा पुन्हा आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. 

हेही वाचा : कोरोनामुळे अजूनही गणेश मूर्तींची विक्री संथगतीने; "या' मूर्तींना मिळतेय भाविकांची पसंती 

मागणी 28 कोटींची अन्‌ मिळाली अडीच कोटींची ग्वाही 
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवींच्या नावे अध्यासन केंद्र सुरू करण्यासाठी विद्यापीठाने 18 कोटी 75 लाख 19 हजार रुपयांचा प्रस्ताव शासनाला सादर केला. तर विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या आश्‍वारूढ स्मारकासाठी सुमारे दहा कोटींची मागणी करण्यात आली आहे. मात्र, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दोन्ही कामांसाठी अडीच कोटींची मदत करू, अशी ग्वाही दिली. दुसरीकडे स्मारकासाठी अद्याप काहीच निधी जमा झालेला नाही. या पार्श्‍वभूमीवर अहिल्यादेवींच्या आश्‍वारूढ स्मारकासाठी लोकवर्गणी मागण्यापेक्षा सरकारने त्यासाठी मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. विकास घुटे म्हणाले, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सर्वच सदस्य अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे सदस्य आहेत. त्यांच्या शिफारशीनुसार माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनाही समितीवर घेण्याचा निर्णय झाला. स्मारक समिती लवकरच अंतिम होईल. तत्पूर्वी, ढोबळे यांना समितीतून काढा, अशा मागणीचे लेखी अर्ज प्राप्त झाले असून त्यावर निर्णय झालेला नाही. 

प्रा. शिवाजीराव बंडगर म्हणाले, विद्यापीठ नामांतर लढ्यास विरोध करणाऱ्या माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांना विद्यापीठाने स्मारक समितीत का घेतले, असा प्रश्‍न आहे. नामांतर लढ्यातील व्यक्‍तींना समितीत घ्यावे आणि स्मारकासाठी त्यातील तंत्रज्ञ, तज्ज्ञांचा समावेश असायला हवा. विद्यापीठ प्रशासनाने ढोबळे यांना स्मारक समितीतून काढावे, अशी आमची मागणी आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top