
चेतन नरोटे यांच्यामुळे काँग्रेस पक्ष अडचणीत - अंबादास करगुळे
सोलापूर : आरक्षणामध्ये पत्ता कट होऊ नये या भीतिपोटी महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेमध्ये माजी गटनेते चेतन नरोटे यांनी हस्तक्षेप करत फोडाफोडी केली. अनुसूचित जातीच्या जागेवर अन्याय केला. नरोटे यांनी स्वत:च्या सोयीसाठी आखलेली रचना पक्षवाढीसाठी अडचणीची ठरणार असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी युवक अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी केला. याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना झाल्यानंतर कोनापुरे चाळीचे दोन भाग करण्यात आले होते.
अंतिम प्रभाग रचनेत सोयीचे बदल करून घेत त्यांनी ही चाळ प्रभाग क्रमांक १२ मधून २१ला जोडले. अंतिम प्रभाग रचना झाल्यानंतर प्रभाग क्रमांक १२ मधील अनुसूचित जातीची लोकसंख्या साडेसहा हजारावरून कमी करून साडेतीन हजारावर आणण्यात आली. त्यामुळे प्रभाग क्रमांक १२ मधील अनुसूचित जातीचे आरक्षण कमी झाले. चेतन नरोटे यांनी स्वत:च्या सोयीसाठी पक्षाला धोक्यात घातले आहे. ज्या भागामध्ये आम्ही मागील पाच वर्षात अनेक विकासकामे केली, तो भाग जाणीवपूर्वक कट करण्यात आला आहे आणि याला चेतन नरोटे जबाबदार असल्याचाही आरोप अंबादास करगुळे यांनी यावेळी केला. याबाबत गटनेते चेतन नरोटे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत भाष्य करण्यास नकार दिला.
Web Title: Congress Chetan Narote Ward Structure Of The Corporation Intervention Allegation Of Ambadas Kargule Solapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..