मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसची जनजागरण मोहीम | Modi government | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेस
आजपासून काँग्रेसची जनजागरण मोहिम सोलापूर जिल्हा काँग्रेस बैठकीत निर्णय

मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसची जनजागरण मोहीम

सोलापूर : मोदी सरकारच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर रविवारपासून (ता.१४) जनजागरण अभियान राबविण्यात येत असून, केंद्र सरकारचा धोरणांचा निषेध व्यक्त करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हा सहप्रभारी चेतन चव्हाण यांनी दिली.
सोलापूर शहर- जिल्हा काँग्रेसची बैठक काँग्रेस भवन येथे यांच्या श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. तालुका गट, गण, गाव पातळीवर २९ नोव्हेंबरपर्यंत हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.

हेही वाचा: पुणे-पंढरपुर पालखीमहामार्गावर ठिय्या मारुन मोदी सरकारच्या विरोधात घोषणा

यामध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यपदार्थ दरवाढीबाबत जनजागरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रसिद्धीप्रमुख सातलिंग शटगार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी दादासाहेब साठे, जिल्हा उपाध्यक्ष मल्लेश बिडवे, जिल्हा महिला अध्यक्ष शाहीन शेख, प्रदेश ओबीसी सरचिटणीस सुधीर लांडे, भीमराव बाळगी, जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष वसीम पठाण, जिल्हा सेवादल अध्यक्ष राजेश पवार, सुलोमन तांबोळी, संजय खरटमल, सतिश पाटील, सिद्राम सलवदे, भीमराव वसेकर, दाजीसाहेब कोकाटे, सागर सोलापुरे, अकबर शेख, सुरेश शिवपुजे, एस. एन. सलवदे, दादासाहेब लबडे, रफिक पाटील उपस्थित होते.

loading image
go to top