

Major Move by Congress: New District Leadership for Madha and Solapur
sakal
-प्रमोद बोडके
सोलापूर : अखिल भारतीय काँग्रेसने २०२९ ची लोकसभा व विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे. त्यासाठी संघटन सृजन अभियान हाती घेतले आहे. या अभियानात ब्लॉक अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष नव्याने नेमले जाणार आहेत. आतापर्यंत राज्यात जिल्हानिहाय जिल्हाध्यक्ष नेमले जात होते. आता लोकसभा मतदारसंघनिहाय जिल्हाध्यक्ष नेमले जाणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात माढा आणि सोलापूर या दोन लोकसभा मतदारसंघासाठी आता दोन स्वतंत्र जिल्हाध्यक्ष काँग्रेसकडून नेमले जाणार आहेत. माढा, सोलापूर व सोलापूर शहर अशा तीन जिल्हाध्यक्षांसाठी उद्यापासून (ता. ५) प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.