esakal | श्री विठ्ठल आणि संत सावता महाराजांच्या भेटीची परंपरा कायम ठेवा; वाचा कोणी केली मागणी 
sakal

बोलून बातमी शोधा

Continue the tradition of meeting Shri Vitthal and Saint Sawta Maharaj

शेकडो वर्षांची परंपरा 
दरवर्षी आषाढ वद्य चतुर्थदशी दिवशी पंढरपूरहून पांडुरंगाची पालखी सावता महाजारांच्या भेटीसाठी अरण (ता.माढा जि.सोलापूर) येथे प्रस्थान ठेवते. भक्त आणि देवाच्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक उपस्थित राहतात. संत सावता महाराज आणि पांडुरंग भेटीची शेकडो वर्षाची परंपरा आहे. 

श्री विठ्ठल आणि संत सावता महाराजांच्या भेटीची परंपरा कायम ठेवा; वाचा कोणी केली मागणी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : संत सावता महाराज पुण्यतिथीच्या निमित्ताने होणारी संत सावता महाराज आणि साक्षात विठ्ठल भेटीची परंपरा यावर्षीही कायम ठेवावी, अशी मागणी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांनी केली आहे. या संदर्भात श्री.आखाडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लेखी निवेदन दिले आहे. संत सावता महाराज आणि पांडुरंग भेटीची शेकडो वर्षाची परंपरा आहे. 
यावर्षी संत सावता महाराज संजीवन समाधी (पुण्यतिथी) सोहळा येत्या 19 जुलै रोजी साजरा होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने विठ्ठलाची पालखी अरण येथे संत सावता महाराजाच्या भेटी येते. भक्त आणि देव यांच्या भेटीची ही शेकडो वर्षाची परंपरा आहे. ती पुढे कायम सुरु ठेवावी अशी मागणी या निमित्ताने श्री. आखाडे यांनी केली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी आषाढी पालखी सोहळ्यासह पंढरपूरची आषाढी यात्रा रद्द केली. प्रतिकात्मक पध्दतीने प्रमुख मानाच्या पालख्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश देण्यात आला होता. मोजक्‍याच वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये यंदाचा आषाढी एकादशीचा सोहळा साजरा करुन आषाढी वारीची परंपरा कायम ठेवली. 
आषाढी वारीनंतर संत सावता माळी यांचा अरण येथे संजीवन समाधी सोहळा साजरा होतो. यावर्षी येत्या 19 जुलै रोजी संत सावता महाराजांची पुण्यतिथी आहे. या दिवशी भक्त आणि देव यांची भेट होती. यावर्षी कोरोना संसर्गजन्य रोगामुळे प्रथा आणि परंपरेनुसार चालत आलेल्या अनेक धार्मिक कार्यक्रमांवर बंधने आली आहेत. तरीही राज्य शासनाने लाखो वारकरी आणि भाविकांच्या भावनांचा विचार करुन प्रथा आणि परंपरा कायम राखत यावर्षीचा आषाढी सोहळा साजरा केला. त्याच धर्तीवर संत सावता महाराज आणि विठ्ठल भेटीचा सोहळा देखील साजरा करावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. पुण्यतिथी सोहळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी एक बैठक बोलावून त्यामध्ये या विषयी अधिक चर्चा करावी, अशी विनंती देखील श्री. आखाडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

संपादन : वैभव गाढवे 

loading image