लोक घरासमोर थांबू देईनात... फळे कशी विकणार? 

Corona affects fruit sellers in Solapur
Corona affects fruit sellers in Solapur
Updated on

सोलापूर : हातगाडीवर फळे विकणाऱ्यांना कोरोनामुळे काहीजण घरासमोरही उभा राहू देत नाहीत. अनेकदा हातगाडीचे भाडेही निघत नाही. पोलिस एका ठिकाणी थांबून विक्री करू देत नाहीत, त्यामुळे सर्व बाजूंनी आमच्यासमोर अडचणी आहेत, असे फळ विक्री करणाऱ्यांनी सांगितले. 
कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर सध्या देशभरात लॉकडाउन सुरू आहे. सगळेच उद्योग बंद आहेत. ज्यांचे हातवरचे पोट आहे, त्यांची उपासमार होईल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत मोठ्या प्रमाणावर शहाळे व अन्य फळांची विक्री होते. सध्या लॉकडाउनमुळे फळांची विक्री कमी झाली आहे. बाहेरून येणारा माल लॉकडाउनमुळे येत नाही. स्थानिक बाजारपेठेतील माल विक्रीसाठी मर्यादित वेळ ठरवून दिली आहे. त्यामुळे फळांचे मोठ्या प्रमाणवर नुकसान होत आहे. त्याचा आर्थिक फटका बसत असल्याचे फळ विक्रेत्यांनी सांगितले. 

बहुसंख्य विक्रेत्यांची घरची परिस्थिती अगोदरपासून बिकट असते. त्यांचे हातावरचे पोट आहे. फळांची विक्री केल्यावरच घरातील चूल पेटते. त्यासोबतच घरभाडे भरावे लागते. घरातील मुलांच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करावा लागतो. त्यामुळे सध्या जगावे की मरावे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी कैफियत फळ विक्रेत्यांनी मांडली. 
लॉकडाउनमध्ये महिन्यापेक्षा अधिक काळ फळविक्री मंदावली आहे. त्यामुळे उधारी करून घर चालवण्याची वेळ फळ विक्रेत्यांवर आली आहे. महिन्यापेक्षा अधिक काळ असाच गेल्याने आता पुन्हा माल आणण्यासाठी पैसे नाहीत. पैशाची जमवाजमव केल्यानंतर मालाची खरेदी करता येणार आहे. आधीची उधारी फेडल्याशिवाय नव्या कमाईचा लाभ मिळणार नाही. मात्र व्यापार सुरू झाला तर पैशाचा प्रश्‍न सुटेल, अशी आशा या विक्रेत्यांना आहे. 

फळविक्री केल्याशिवाय आमच्या घरात चूल पेटत नाही 
आमचे हातावरचे पोट आहे. फळविक्री केल्याशिवाय आमच्या घरात चूल पेटत नाही. सध्या लॉकडाउनमुळे व्यवसाय बंद ठेऊन बसावे लागत असल्याने उपासमार होत आहे. घरची परिस्थिती बिकट आहे. हातगाडीवर फळांची विक्री करतो. हातगाडीचे भाडेसुद्धा निघत नाही, अशी परिस्थिती सध्या आहे. 
- जुबेगा बागवान, फळ विक्रेत्या 

सध्या रोजचा खर्च निघणेसुद्धा कठीण झाले 
घरात कमाविणारा गडीमाणूस कोणी नाही. त्यामुळे मी सात रस्त्याला शहाळ विक्रीचा व्यवसाय करते. लॉकडाउनमुळे शहाळ विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. आठ माणसांना सांभाळावे लागते. परिस्थिती हलाखीची आहे. सध्या रोजचा खर्च निघणेसुद्धा कठीण झाले आहे. सरकारने आम्हाला शहाळ विक्रीसाठी परवानगी द्यावी. 
- सुमन रणदिवे, शहाळ विक्रेत्या 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry
Marathi News Esakal
www.esakal.com