कर्मचाऱ्यांना कोरोना अन्‌ रेशन दुकानदारांच्या संपामुळे मिळेना केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य 

retion
retion
Updated on

सोलापूर : कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन स्वीकारला. लॉकडाऊनमुळे हातातील व्यवसाय आणि रोजगार कमी झाला. हाताची अन्‌ तोंडाची गाठ घालावी यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून शिधापत्रिकारकांना मोफत धान्य देण्याचा निर्णय झाला. केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला. मे महिन्यापर्यंत धान्यही मिळाले. जूनमधील केशरी शिधापत्रिकाधारकांचे धान्य मात्र विचित्र संकटात अडकले आहे. 

रेशन दुकानदारांनी प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारल्याने केशरी शिधापत्रिकाधारकांच्या जूनमधील धान्याला मुहूर्त मिळाला नाही. संपाचा विषय काही प्रमाणात मार्गी लागलेला असतानाच केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळण्यात कोरोनाची मुख्य अडचण समोर आली. भारतीय अन्न महामंडळातील कर्मचारीच कोरोनाबाधित झाल्याने केशरी शिधापत्रिकाधारकांना जूनचे धान्य वेळेत मिळू शकले नाही. सुरवातीला कोरोना आणि नंतर लॉकडाऊनचा सामना करणाऱ्या केशरी शिधापत्रिकाधारकांना भलत्याच संकटाला सामोरे जावे लागले आहे. आपले धान्य दुकानदाराने तर हडप केले नाही ना? असाही संशय अनेकांच्या मनात घोळून गेला. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांनाही 8 रुपये किलो दराने गहू आणि 12 रुपये किलो दराने तांदूळ वाटपाचे नियोजन केले होते. त्यानुसार मे महिन्यात सोलापूर शहरात 8 हजार 934 क्विंटल गहू आणि 5 हजार 952 क्विंटल तांदळाचे वितरण करण्यात आले आहे. जून महिन्यातील धान्य खरेदीसाठी सोलापूरच्या अन्नधान्य वितरण कार्यालयाने 7 कोटी 22 लाख 25 हजार रुपये भारतीय अन्न महामंडळाकडे जमाही केले आहेत. मात्र रेशन दुकानदारांचा संप, भारतीय अन्न महामंडळातील कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने कार्यालय बंद असल्याने धान्याची उचल करता आली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

पंढरपूर चंद्रभागा नदी
solapur rural police
पोलिसांचा बंदोबस्त
According to officials, prompt medical response and administrative coordination helped ensure timely treatment, and the patient is reported to be in stable condition.
Marathi News Esakal
www.esakal.com