esakal | कोरोना इफेक्‍ट : पंढरपुरातील एसटीच्या एक हजार फेऱ्या रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

corona effect one thousand rounds of st canceled in pandharpur

पंढरपूर आगाराचे दररोज 10 लाखांचे नुकसान 
पंढरपूर येथील आगाराच्या 276 पैकी 213 फेऱ्या रद्द केल्या आहेत. येथील एसटीची प्रवासी वाहतूक जवळपास 80 टक्के ठप्प झाली आहे. प्रवासी वाहतूक ठप्प झाल्याने येथील बस स्थानकाचे दिवसाचे सुमारे 10 लाख रुपयांचे उत्पन्न कमी झाले आहे.

कोरोना इफेक्‍ट : पंढरपुरातील एसटीच्या एक हजार फेऱ्या रद्द

sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (जि. सोलापूर) : पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे राज्यासह इतर राज्यातून मोठ्या संख्येने भाविक येथे एसटीने येतात. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद केल्याने भाविकांची संख्या पूर्णतः घटली आहे. त्याचा परिणाम येथील बस वाहतुकीवर झाला आहे. पुरेशा प्रमाणात भाविकांची संख्या नसल्याने येथील बस स्थानकातून होणाऱ्या एसटीच्या एक हजार फेऱ्या रद्द झाल्या आहेत. यामुळे एसटीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाय योजना केल्या जात आहेत. गर्दी कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने येथील विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद केले आहे. त्यामुळे राज्यभरातून येणारे भाविक आता पंढरीत येत नाहीत. भाविक येत नसल्याने एसटीच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. येथील एसटी बस स्थानक हे राज्यातील सर्वांत मोठे बस स्थानक म्हणून ओळखले जाते. येथील बस स्थानकातून दररोज राज्यासह कर्नाटक, आंध्रप्रेदश, मध्यप्रदेश, गोवा, गुजरात, तेलंगणा आदी राज्यातून बसने भाविक पंढरीत येतात. 
येथील बस स्थानकातून दिवसाला 1 हजार 600 फेऱ्या होतात. गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाच्या भीतीने भाविकांनीही पंढरीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे एसटी बस वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. पुरेशा प्रमाणात प्रवासी संख्या नसल्याने सुमारे 1 हजार फेऱ्या रद्द केल्या आहेत. 
प्रवाशांची गैरसोय व्होऊनये यासाठी बसस्थानकातून आज टेंभूर्णीसह ग्रामीण भागात काही मार्गावर बससेवा सुरू होती. पुढील दिवस महत्वाचे असल्याने प्रवाशांनी शक्‍यतो प्रवास टाळावा असे आवाहन ही येथील बसस्थानक प्रमुख श्री.सुतार यांनी केले आहे. 

loading image