esakal | कोरोना : सुट्टीत बाहेर फिरण्यापेक्षा हे करा
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Enjoy the holidays

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा 
कोरोनामुळे मिळालेली सुट्टी ही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. कारण स्पर्धा परीक्षांसाठी कितीही अभ्यास केला तरी तो कमीच आहे. सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की सर्वांना घरी बसून राहावे लागत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मिळालेला वेळेचा सदुपयोग करायला हवा.

कोरोना : सुट्टीत बाहेर फिरण्यापेक्षा हे करा

sakal_logo
By
सुस्मिता वडतीले

सोलापूर : कोरोना व्हायरस विषाणू संसर्गाने धूमाकूळ घातला आहे. त्यामुळे घराबाहेर फिरणारे घरात बसले आहेत. त्यात अनेकजण सुट्टी मिळाली, की आराम करण्यात वेळ घालवतात. मात्र त्यात गृहीणी, छायाचित्रकार, स्पर्धापरीक्षा देणारे विद्यार्थी आणि शेतकरीवर्ग अशा ही काही व्यक्ती आहेत, ज्या वेळेचा नेहमी सदुपयोग करतात आणि इतरांना ही करण्याविषयी सल्ला देतात. कोरोनो प्रादुर्भाव वाढल्यामुळे अनेकजण त्या वेळेचा सदुपयोग करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मग या सुट्टीत तुम्ही काय करणार.... 

मग हे करा 
आजपासून 31 मार्चपर्यंत मुलांच्या सहवासात आपण कायकाय करु शकतो. याची छोटीशी यादी... 

  1. गोष्टी भरपूर सांगा 
  2. मुलांना भरपूर खेळू द्या 
  3. त्यांच्या आवडीच्या ऍक्‍टीव्हिटीज करुन घ्या 
  4. जवळच्या सर्व नातेवाईकाना पत्र लिहायला प्रोत्साहन द्या 
  5. कल्पना शक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळे विषय देऊन बोलतं करा... (उदा : मोबाईल आणि आई/बाबा, टीव्ही आणि आजी आजोबा, पैसे आणि आपण) 
  6. आपल्या आजूबाजूच्या लोकांबद्दल मुलाना माहीती करुन द्या 
  7. अंगणात/ गच्चीवर झोपून चंद्र, चांदण्या, तारे यांची मजा घेऊ द्या. आकाशाचे रंग कळू द्या. 
  8. सतत मुलाना काय आवडतंय याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत रहा... (उदा : जुने खराब मोबाईल, रिमोट, रेडीओ, चार्जर्स, अगदी ओव्हन, मिक्‍सर या गोष्टी त्यांना खेळण्यासाठी उपलब्ध करुन द्या) 
  9. नृत्य, गाणी, वेगवेगळ्या भेंड्या, कोडी यांच्या मैफीली जमू द्या 

सुट्टीचा वापर छंद पूर्ण करण्यासाठी 
सुट्टीमुळे सर्व घरात असल्यामुळे घरातील कामात मदत मिळत आहे. सुट्टीमुळे महिन्याभरापासून वारली चित्रकला शिकत होते. शिकलेली कला अंगीभूत करण्यासाठी सराव करण्याचे ठरवले. गेल्या दोन दिवसांपासून दुपारी वारली पेंटिंग काढत बसते. सुट्टीचा वापर छंद पूर्ण करण्यात जात आहे. त्यामुळे मन अगदी प्रसन्न होते. वारली पेंटिंग ही कला अत्यंत साधी आणि सोपी आहे. वारली समजण्याची ही कला अत्यंत लोकप्रिय असून सहज चित्रातून संदेश देणे, प्रसंग निर्मिती करणे सोपे आहे. मिळालेला वेळेचा सदुपयोग सर्वांनी करावा. 
- संध्या भांगे, गृहीणी 

लग्न समारंभात गर्दी नाही 
सध्या सर्वत्र भीतीच वातावरण आहे. लग्न, जत्रा, समारंभासही बंदी आहे. मी व्यावसायिक छायाचित्रकार आहे. लग्न सराईत वधू वरांचे आणि आलेल्या मान्यवरांचे फोटो काढणे हा पेशा. पहिल्यांदाच असा अनुभव घेतला, की लग्न समारंभात गर्दी नाही. आलेल्या मान्यवर स्वतःविषयी चिंतीत आहेत. छायाचित्रकार हा आमचा व्यवसाय असल्यामुळे आम्हाला बाहेर पडावे लागते. आम्ही स्वतःची आवश्‍यक ती काळजी घेवुन बाहेर पडत आहोत. कोरोनामुळे अनेक कार्यक्रम रद्द झाल्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे. मात्र यामुळे कोरोना विरुद्धचा लढा उभा राहिला आहे. यातच आम्ही संतुष्ट आहोत 
-अविनाश म्हसोंडे, छायाचित्रकार 

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा 
कोरोनामुळे मिळालेली सुट्टी ही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. कारण स्पर्धा परीक्षांसाठी कितीही अभ्यास केला तरी तो कमीच आहे. सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की सर्वांना घरी बसून राहावे लागत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मिळालेला वेळेचा सदुपयोग करायला हवा. इतके च नाही, तर आपण परिस्थितीचा सामना करायला हवा. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होवून अधिकारी होण्याचे अनेकाचे स्वप्न असते. त्यामुळे सर्वांनी यावेळचे योग्य नियोजन आणि अभ्यास करणे आवश्‍यक आहे. काही वेळ शांत राहून गोष्टी हाताळायच्या, हे विसरून चालणार नाही. 
- सानिका गाडे, विद्यार्थिनी 

शेतकरी अघरी बसु शकत नाही. 
कोरोनाने आज जगभरात थैमान घातलेले आहे. कलम 144 नुसार सर्वांना सक्तीने घरात थांबायला सांगितले आहे. कारखानदारी, ऑफिस, व्यवसायिक व नोकरदार वर्ग सगळेजण घरी बसले आहेत. पण एकमेव शेतकरी असा आहे तो घरी बसु शकत नाही. सुगीचे दिवस, फळबागांची काढणी, शेतीला पाणी देणे, जनावरांना वैरण-पाणी करणे, दुध काढणे हे नित्याचे काम तो करत आहे. कोरोना मुळे आयात-निर्यात, आठवडी बाजार यावर परिणाम झाल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतकरी एकप्रकारे सरकारी नियमांचे पालन आपले काम करुन करत आहे. 
- सागर धर्मे, युवाशेतकरी

loading image