शहरात कोरोनाचा दणका ! 'या' नगरांमध्ये सापडले 162 रुग्ण; तिघांचा बळी 

5e6f13b6214ed825688f3203 - Copy.jpg
5e6f13b6214ed825688f3203 - Copy.jpg

सोलापूर : शहरातील दोन हजार 700 व्यक्‍तींची शनिवारी (ता. 25) ऍन्टीजेन टेस्ट करण्यात आली. त्याच्या अहवाल महापालिकेने आज दिला असून त्यामध्ये 162 व्यक्‍तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 65 वर्षांवरील तिघांचा मृत्यू झाला आहे. 

बसवेश्‍वर नगर, कस्तुर बाग, स्वामी विवेकानंद नगर, मजरेवाडी, रेवणसिध्देश्‍वर नगर (होटगी रोड), दक्षिण सदर बझार, ग्रीन अपार्टमेंट (वारद फार्मजवळ), सेटलमेंट कॉलनी क्रमांक दोन, सम्राट चौक, दाराशा हॉस्पिटल, हनुमान नगर, जम्मा वस्ती, स्टेट बॅंक कॉलनी भाग दोन (भवानी पेठ), मल्लिकार्जुन नगर, स्वामी विवेकानंद नगर (हत्तुरे वस्ती), नळ बाझार, बालाजी मंदिराजवळ (लष्कर), मोदी, संजय नगर, सुरवसे हायस्कूलजवळ, नरसिंह नगर, श्रीलक्ष्मी अपार्टमेंट, अभिजित रेसिडेन्सी, गुरुदेव दत्त नगर (जुळे सोलापूर), मुमताज नगर, सम्राट अशोक सोसायटी, स्वागत नगर (कुमठा नाका), सावंत नगर (ताई चौक), लोणार गल्ली (पत्रा तालिमजवळ), मजरेवाडी नागरी आरोग्य केंद्र, दक्षिण कसबा, किरण नगर, न्यू बुधवार पेठ, वेदांत नगर, पश्‍चिम मंगळवार पेठ, दाजी पेठ, शुक्रवार पेठ, मित्र नगर, हरिपद्म सोसायटी (बुधवार पेठ), मिलिंद नगर, सिंधू विहार, नेहरु नगर, उत्कर्ष नगर, कोळी हौसिंग सोसायटी (विजयपूर रोड), सवेरा नगर (सैफूल), माणिकचंद चाळ (मुरारजी पेठ), मौलाली चौक, सागर गॅस गोडाऊनजवळ, दाल गल्ली, पटर्वधन चाळ (वांगी रोड), विष्णू मिल चाळ, श्रीशैल नगर, मेहताब नगर, विद्या नगर (शेळगी), जोडभावी पेठ, मौलाना आझाद चौक, आंबेडकर नगर (नई जिंदगी), हुच्चेश्‍वर नगर भाग चार, अनिता नगर (हुच्चेश्‍वर मठाजवळ), फलमारी झोपडपट्टी, रेणुका नगर (विडी घरकूल), शिवाजी नगर, गणेश नगर, संतोष नगर (बाळे), विकास नगर, महादेव नगर, अशोक चौक, जुना पुना नाका (माशाळ वस्ती), गणेश नगर (हैदराबाद रोड), प्रताप नगर, मुरारजी पेठ, कमला नगर, दमाणी नगर, घोंगडे वस्ती, सिव्हिल क्‍वार्टर, मरिआई चौक, जुनी मिल विष्णू चाळ, न्यू पाच्छा पेठ, अक्‍कलकोट रोड, विद्या नगर (सदर बझारजवळ), साठे-पाटील वस्ती, थोबडे वस्ती, जिल्हा परिषद शाळेजवळ (देगाव नाका), शास्त्री नगर, बल्लारी चाळ, कुमठा तांडा याठिकाणी हे रुग्ण सापडले आहेत. 

ठळक बाबी... 

  • शहरात आज सापडले नव्याने 162 रुग्ण; एकूण रुग्णसंख्या चार हजार 563 झाली 
  • आज तिघांचा मृत्यू झाला असून आता एकूण मृतांची संख्या 345 झाली आहे 
  • एकूण रूग्णांपैकी दोन हजार 841 रुग्णांची कोरोनावर मात; सध्या एक हजार 377 रुग्णांवर उपचार सुरु 
  • शहरातील एकूण 27 हजार 730 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट; दररोज दीड ते दोन हजार ऍन्टीजेन टेस्टचे उद्दिष्टे 
  • विजयपूर रोडवरील प्रताप नगरातील 74 वर्षीय पुरुषाचा तर संतोष नगर, बाळे येथील 81 वर्षीय आणि देगाव परिसरातील 65 वर्षीय पुरुषाचा झाला मृत्यू 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com