esakal | कोरोनामुळे गणेशोत्सवात मंडप कॉंट्रॅक्‍टर्स व पूरक व्यावसायिकांची कोट्यवधींची उलाढाल ठप्प 
sakal

बोलून बातमी शोधा

mandap.

शहरातील प्रत्येक मंडळाकडून श्री गणरायाची सजवलेल्या मंडपात प्रतिष्ठापना करून अकरा दिवस आराधना केली जाते. याच कालावधीत गौरींचे आगमन होत असते. घरगुती गौरी-गणपतीची सजावटही मोठ्या प्रमाणात होत असते. या सर्व कामांसाठी शहरातील मंडप कॉंट्रॅक्‍टर्स, फ्लॉवर्स डेकोरेटर्स, लाईट व साउंड व्यावसायिक, जनरेटर भाड्याने पुरवणारे आदी व्यावसायिकांना मोठे उत्पन्न मिळत असते. मात्र या वर्षी गणेशोत्सवात मिरवणुका नाही, मंडप नाही व सजावटही नसल्यामुळे या सर्व व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या व्यवसायातील कामगारांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. 

कोरोनामुळे गणेशोत्सवात मंडप कॉंट्रॅक्‍टर्स व पूरक व्यावसायिकांची कोट्यवधींची उलाढाल ठप्प 

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी 22 मार्च महिन्यापासून तीन महिन्यांच्या कडक लॉकडाउननंतर 5 जूनपासून काही अंशी लॉकडाउनमध्ये शिथिलता आली. उद्योग-व्यवसाय प्रशासनाने नेमून दिलेल्या वेळेत सुरू झाले. मात्र लॉकडाउनच्या दरम्यान विवाह समारंभ रद्द झाले. आता गणेशोत्सवातही मिरवणुका, मंडप, डेकोरेशन आदींवर बंदी घालण्यात आली. यामुळे मोठ्या व्यवसायाची संधी असलेल्या गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मंडप कॉंट्रॅक्‍टर्स, डेकोरेटर्स, फ्लावर्स डेकोरेटर्स, इलेक्‍ट्रिक डेकोरेटर्स, साउंड सिस्टीम कॉंट्रॅक्‍टर्स या व्यावसायिकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. 

हेही वाचा : पोलिस पती-पत्नीच्या पुढाकारातून युवकांचा स्पर्धा परीक्षा व पोलिस भरतीचा सराव

गणेशोत्सव म्हणजे आबालवृद्धांच्या आनंदाला उधाण येते. घरोघरी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाच्या स्वागतासाठी मोठी सजावट करण्यात येते. लहान-मोठ्या मंडळांमध्ये जणू मोठे मंडप घालून सजावटीची चढाओढ सुरू असते. यासाठी लहान मंडळांचा 50 हजार रुपयांपर्यंत तर मोठ्या मंडळांचा खर्च लाखो रुपयांपर्यंत येत असतो. सोलापूर शहरात गेल्या वर्षी जवळपास लहान-मोठ्या 1200 मंडळांची नोंदणी झाली होती मात्र जवळपास 2200 मंडळांची स्थापना करण्यात आली. यावर्षी शहरातील नोंदणीकृत तब्बल 900 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशाची स्थापना केली नाही.

हेही वाचा : कहाणी एका जिद्दी "सु'यशाची अन्‌ न दमलेल्या बापाची; मुलाची अर्जुन पुरस्काराला गवसणी !

प्रत्येक मंडळाकडून श्री गणरायाची सजवलेल्या मंडपात प्रतिष्ठापना करून अकरा दिवस गणेशाची आराधना केली जाते. याच कालावधीत गौरींचे आगमन होत असते. घरगुती गौरी-गणपतीची सजावटही मोठ्या प्रमाणात होत असते. या सर्व कामांसाठी शहरातील मंडप कॉंट्रॅक्‍टर्स, फ्लॉवर्स डेकोरेटर्स, लाईट व साउंड व्यावसायिक, जनरेटर भाड्याने पुरवणारे व्यावसायिकांना मोठे उत्पन्न मिळत असते. मात्र या वर्षी गणेशोत्सवात मिरवणुका नाही, मंडप नाही व सजावटही नसल्यामुळे या सर्व व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या व्यवसायातील कामगारांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. 

कोट्यवधींच्या नुकसानीचा अंदाज 
लहान मंडळांकडून किमान 50 हजार तर अनेक मोठ्या मंडळांकडून गणेशोत्सव कालावधीत मंडप उभारणी व डेकोरेशनसाठी लाखोंचा खर्च केला जातो. त्यामुळे मंडप कॉंट्रॅक्‍टर्स व इतर पूरक व्यावसायिकांची कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. उलट कामगारांना निम्मा पगार देत त्यांचा सांभाळ करावा लागत आहे, ही बाब वेगळीच. 

ठळक... 

  • शहरात गेल्या वर्षी नोंदणी झालेली गणेश मंडळे : 1200 
  • बिगर नोंदणी मंडळे : 2200 
  • लहान-मोठ्या मंडळांचा मंडप व डेकोरेटिंगसाठी येणारा खर्च : 50 ते एक लाखाच्या पुढे 
  • मंडप कॉंट्रॅक्‍टर्स : जवळपास 500 
  • लाईट-साउंड डेकोरेटर्स : जवळपास 400 
  • फ्लॉवर्स डेकोरेटर्स : अंदाजे 100 
  • एका मंडळामागे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मिळणारा रोजगार : 100 कामगारांना 

सोलापूर जिल्हा मंडप कॉन्ट्रॅक्‍टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गवळी म्हणाले, कोरानामुळे लग्नसराईतील मोठी कामे हातातून गेली. गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात मंडप, डेकोरेशन, साउंड सिस्टीम आदींची कामे मिळत असत आता तीही हातातून गेल्यामुळे मंडप कॉंट्रॅक्‍टर्ससह पूरक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लाखोंची केलेली गुंतवणूक वाया गेली आहे.

loading image
go to top