कोरोना होतोय कमी! सोलापुरातील कोविड केअर सेंटर बंद; डॉक्‍टरांना मिळेना वेतन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

covid hospital
शहरातील रुग्णसंख्या कमी झाल्याने वाडिया व गर्व्हनमेंट पॉलिटेक्‍निक कॉलेज येथील कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय झाला आहे.

कोरोना होतोय कमी! सोलापुरातील कोविड केअर सेंटर बंद; डॉक्‍टरांना मिळेना वेतन

सोलापूर : कोरोनाची तिसरी लाट आता सौम्य झाली असून संसर्गही ओसरत आहे. या पार्श्‍वभूमीवर वाडिया हॉस्पिटल व शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज येथील कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर कंत्राटी पध्दतीने घेतलेल्या नऊ डॉक्‍टरांनाही कार्यमुक्‍त करण्यात आले आहे.

हेही वाचा: महाराष्ट्र नाट्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची सोमवारपासून प्राथमिक फेरी

कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या लक्षणीय होती. लक्षणे नसलेल्यांसह संशयितांनाही कोविड केअर सेंटर व क्‍वारंटाईन सेंटरमध्ये किमान आठ दिवसांसाठी ठेवले जात होते. त्यामुळे शहरात जवळपास नऊ ठिकाणी त्या रुग्णांची सोय करण्यात आली होती. त्यांच्यावरील खर्चही भरमसाठ झाला. परंतु, कोरोनावरील प्रतिबंधित लसीकरणामुळे सुरवातीपासूनच तिसरी लाट सौम्य पहायला मिळाली. दुसरीकडे केंद्रीय आरोग्य विभागाकडून लक्षणे नसलेल्या रुग्णांना त्यांच्याच घरी उपचारास परवानगी मिळाली. त्यामुळे रुग्णालय, कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलवरील ताण वाढला नाही. तिसऱ्या लाटेत विशेषत: 1 जानेवारीपासून सोलापूर शहरात चार हजार 115 रुग्ण आढळले. तर 43 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे एकूण बाधितांपैकी बहुतेक रुग्ण त्यांच्या घरीच उपचार घेऊन बरे झाले. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज आणि वाडीया हॉस्पिटलमध्ये पुन्हा कोविड केअर सेंटर सुरू केले होते. तर केगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात सुरु करण्याचे नियोजन होते. दरम्यान, शहरात मागील काही दिवसांपासून दहापेक्षा कमी रुग्ण आढळत असल्याने सुरु केलेले सेंटर्स बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

हेही वाचा: बंद घरांवर चोरट्यांचा डोळा! सोलापुरात 48 दिवसांत 46 दुचाकींची चोरी

शहरातील रुग्णसंख्या कमी झाल्याने वाडिया व गर्व्हनमेंट पॉलिटेक्‍निक कॉलेज येथील कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय झाला आहे. तिसऱ्या लाटेची तीव्रता पहिल्या दोन्ही लाटांच्या तुलनेत अतिशय सौम्य राहिल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला नाही.
- डॉ. बसवराज लोहारे, आरोग्याधिकारी, सोलापूर महापालिका

हेही वाचा: शिवसेना पदाधिकाऱ्यांना पक्षांतराची भीती! संपर्कप्रमुख नाहीत, मंत्र्यांकडून निधी मिळेना

तिसऱ्या लाटेत
हॉस्पिटलमध्ये पाचशेपेक्षाही कमी रुग्ण

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जवळपास चार हजार नवीन रुग्ण आढळले. पॉझिटिव्हीटी दर अधिक असतानाही मृत्यूचे प्रमाण अत्यल्प राहिले. दुसरीकडे रुग्ण वाढत असतानाही हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्ण, ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटरची गरज लागणारे रुग्णही खूपच कमी होते. तिसऱ्या लाटेत अंदाजित 500 पेक्षाही कमी रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाले, अशी माहिती आरोग्य विभागातील विश्‍वसनिय सूत्रांनी दिली. प्रतिबंधित लसीकरणामुळे हा सकारात्मक परिणाम दिसून आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: कमी गुण पडलेल्यांना श्रेणी सुधारण्याची संधी!

कंत्राटी डॉक्‍टर वेतनाविना
कोरोनाच्या संकटातून शहरातील नागरिकांचा जीव वाचविण्याच्या निमित्ताने महापालिका प्रशासनाने कंत्राटी डॉक्‍टरांची नियुक्‍ती केली. कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये काही ठरावीक डॉक्‍टरांना पुढे कायम ठेवण्यात आले. परंतु, बहुतेकवेळा त्यांना दरमहा कधी वेतन मिळालेच नाही. तरीही, त्यांनी प्रामाणिकपणे सेवा बजावली. आता त्यांना जानेवारीचे वेतन अजूनपर्यंत मिळालेले नाही.

Web Title: Corona Is Getting Less Kovid Care Centers In Solapur Closed Doctors Do Not Get

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top