esakal | सोलापूर जिल्ह्यातील 81 टक्के गावांमध्ये पोहोचला कोरोना, 212 गावांनी रोखला कोरोना 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

सोलापूर जिल्ह्याच्या नागरी व ग्रामीण भागात 30 सप्टेंबरपर्यंत 25 हजार 435 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 61.67 टक्के म्हणजे 15 हजार 687 पुरुषांचा समावेश आहे. उर्वरित 38.33 टक्के म्हणजे 9 हजार 748 महिलांचा समावेश आहे. ग्रामीण भागात बाधितांमध्ये पुरुषांची संख्या अधिक आहे. 30 सप्टेंबरपर्यंत ग्रामीण भागातील 688 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकूण 688 मृतांपैकी 590 मृत व्यक्ती या 50 च्या पुढील वयोगटातील आहेत. 

सोलापूर जिल्ह्यातील 81 टक्के गावांमध्ये पोहोचला कोरोना, 212 गावांनी रोखला कोरोना 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. सोलापूर जिल्ह्यात असलेल्या एकूण 1 हजार 134 गावांपैकी तब्बल 81 टक्के गावे कोरोना बाधित झाली आहेत. जिल्ह्यातील 922 गावांमध्ये कोरोना दाखल झाला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीनूसार ही आकडेवारी हाती आली आहे.

चिनमध्ये येणारा कोरोना आपल्या गावात कशाला येईल? अशा एकेकाळी पारावर रंगणाऱ्या गप्पा आता कोरोना कधी जाणार? या विषयावर सुरु झाल्या आहेत. 
देशाचा रिकव्हरी रेट सध्या 82.4 टक्के आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 76.9 तर सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा रिकव्हरी रेट 73.4 टक्‍यांवर आला आहे. सोलापूर ग्रामीणचा पॉझिटिव्हिटी रेट 13.5 टक्के आहे. देशाचा पॉझिटिव्हिटी रेट 8.4 तर महाराष्ट्राचा पॉझिटिव्हिटी रेट 21.9 टक्के आहे.

सोलापूरच्या ग्रामीण भागात कोरोनामुळे मृत पावणाऱ्या व्यक्तींची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. ग्रामीण भागाचा मृत्यूचा टक्का सध्या 2.7 एवढा आहे. देशाचा मृत्यूचा टक्का 1.4 तर राज्याचा मृत्याचा टक्का 2.4 एवढा आहे. सोलापूरच्या ग्रामीण भागातील मृत्यूचा टक्का हा देशाच्या टक्केवारीपेक्षाही अधिक आहे. 

तालुकानिहाय कोरोनाची स्थिती 
अक्कलकोट 
एकूण गावे : 140 
बाधित गावे : 91 
कोरोना मुक्त गावे : 49 

बार्शी 
एकूण गावे : 138 
बाधित गावे : 123 
कोरोना मुक्त गावे : 15 

करमाळा 
एकूण गावे : 118 
बाधित गावे : 95 
कोरोना मुक्त गावे : 23 

माढा 
एकूण गावे : 108 
बाधित गावे : 86 
कोरोना मुक्त गावे : 22 

मंगळवेढा 
एकूण गावे : 81 
बाधित गावे : 74 
कोरोना मुक्त गावे : 7 

मोहोळ 
एकूण गावे : 103 
बाधित गावे : 81 
कोरोना मुक्त गावे : 22 

माळशिरस 
एकूण गावे : 117 
बाधित गावे : 101 
कोरोना मुक्त गावे : 16 

पंढरपूर 
एकूण गावे : 101 
बाधित गावे : 92 
कोरोना मुक्त गावे : 9 

सांगोला 
एकूण गावे : 102 
बाधित गावे : 79 
कोरोना मुक्त गावे : 23 
कोरोना मुक्त गावांची नावे : 

दक्षिण सोलापूर 
एकूण गावे : 90 
बाधित गावे : 71 
कोरोना मुक्त गावे : 19 

उत्तर सोलापूर 
एकूण गावे : 36 
बाधित गावे : 29 
कोरोना मुक्त गावे : 7 

कोरोनाचा शिरकाव थोपविलेली सोलापूर जिल्ह्यातील गावे 
अक्कलकोट : डोंबरजवळगे, दहिटणेवाडी, हालहळ्ळी, हसापुर, बोरोटी बु., आंदेवाडी ज., परमानंदनगर, सेवानगर, विजयनगर, चिंचोली मै., म्हेत्रे तांडा, सोळसे तांडा, जकापूर, वसंतराव नाईक नगर, सेवालालनगर, बॅगेहळ्ळी, कोन्हाळी, आळगे, शेगाव, धारसंग, आंदेवाडी खु., आंदेवाडी बु., देवीकवठे, घुंगरेगाव, चिंचोळी न., कुमठे, केगाव खु., चिक्केहळ्ळी, ममदाबाद, इब्राहिमपूर, नागोरे, बिंजगेर, सातनदुधनी, उमरगे, इटगे, हिळ्ळी, मराठवाडी, बादोले खु., काळेगाव, कोळेकरवाडी, कोळीबेट, सांगवी खु., शिरसी, सापळे, सादलापूर, शिरवळवाडी, भुरीकवठे, मातनहळ्ळी, रामपूर. 
बार्शी : पिंपळगाव दे., वाघाचीवाडी, टोणेवाडी, पांढरी, आश्रम तांडा, यमाई तांडा, संगमनेर, भांडगाव, कासारी, चिंचखोपन, भन्साळे, गोडसेवाडी, बेलगाव, वालवड, तावरवाडी, गवळेवाडी. 
माढा : गवळेवाडी, महादेववाडी, लोणी, चांदज, टाकळी, गारअकोले, रुई, आलेगाव खु., निमगाव मा., जामगाव, हटकरवाडी, बादलेवाडी, उजनी मा., जाखले, चौभेपिंपरी, जाधववाडी, रोपळे खु., खैरेवाडी, आहेरगाव, परितेवाडी, भोइंजे, भेंड. 
करमाळा : बोरगाव, बाळेवाडी, भाळवणी, दिलमेश्वर, वडाचीवाडी, दिवेगव्हाण, घारगाव, गोयेगाव, कामोणे, कावळवाडी, कोंढार, चिंचोली, मांजरगाव, मिरगव्हाण, पारेवाडी, पोटेगाव, रामवाडी, राजुरी, सौंदे, सातोली, टाकळी, वडशिवणे, पोंधवाडी. 
मंगळवेढा : जंगलगी, शिवणगी, महमदाबाद शे., महमदाबाद हु., लोणार, पडोळकरवाडी, सिद्धनकेरी. 
माळशिरस : विठ्ठलवाडी, कलंबोली, दत्तनगर, प्रतापनगर, फडतरी, कोथळे, निवटेवाडी, मगरवाडी, हनुमानवाडी, काळमवाडी, साळमुखवाडी, सुळेवाडी, शिवार वस्ती, घुलेनगर, विजयवाडी, झंजेवाडी. 
मोहोळ : सिद्धेवाडी, ढेकळेवाडी, कोंबडवाडी, कुरणवाडी, तेलंगवाडी, खंडोबाचीवाडी, वरकुटे, कोथाळे, शिवनी शिरापूर, खुनेश्वर, भैरववाडी, मनगोळी, दाईंगडेवाडी, सय्यद वरवडे, मुंडेवाडी, नांदगाव, राम हिंगणी, कातेवाडी, जामगाव खु., शिरापूर, वडदेगाव, आरबळी. 
उत्तर सोलापूर : भागाईवाडी, शेरेवाडी, रानमसले, मोहितेवाडी, सेवालाल नगर, तरटगाव, पाथरी. 
पंढरपूर : बिटरगाव, वेणुनगर, सुगाव, जाधववाडी, खरातवाडी, शंकरगाव नळी, विटे, तरटगाव, शेवते. 
सांगोला : मेटकरवाडी, देवकतेवाडी, लिगाडेवाडी, बंडगरवाडी, झापाचीवाडी, आगलावेवाडी, बुरंगेवाडी, भोपसेवाडी, बुरलेवाडी, गावडेवाडी, नराळे, पाचेगाव बु., काळूबाळूवाडी, गुणापवाडी, मिसाळवाडी, नलावडेवाडी, करांडेवाडी, बुद्धेहाळ, जाधववाडी, इटकी, जुनी लोटेवाडी, सातारकर वस्ती, कारंडेवाडी (माहिम). 
दक्षिण सोलापूर : चिंचपूर, बंदलगी, निंबर्गी, बाळगी, खानापूर, संगदरी, गंगेवाडी, ऊळेवाडी, आलेगाव, यत्नाळ, सावतखेड, बसवनगर, गावडेवाडी, दिंडूर, वडगाव, शिर्पनहळ्ळी, तीर्थ, गुद्देहळ्ळी, हणमगाव.

loading image