सोलापूर ग्रामीणमधील कोरोना हाताबाहेर! एकाच दिवशी 20 मृत्यू; 'या' गावांमध्ये आढळले 394 रुग्ण 

5e6f13b6214ed825688f3203 - Copy.jpg
5e6f13b6214ed825688f3203 - Copy.jpg

सोलापूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा घट्ट झाला असून प्रशासनही हतबल झाले आहे. सोलापुरात कोरोनाने प्रवेश केल्यापासून प्रथमच ग्रामीण भागात कोरोनाचे तब्बल 20 बळी गेले आहेत. आज (बुधवारी) ग्रामीण भागातील तीन हजार 645 संशयितांची टेस्ट पार पडली. त्यात 234 पुरुष आणि 160 महिला पॉझिटिव्ह आढळले आहेत. दुसरीकडे बार्शी तालुक्‍यातील 11 रुग्णांचा तर करमाळ्यातील दोन, माढ्यातील तीन, उत्तर सोलापुरातील एक, पंढरपुरातील तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ठळक बाबी... 

  • ग्रामीण भागातील एक लाख 19 हजार 371 संशयिंतांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत 11 तालुक्‍यांत आढळले 14 हजार 916 रुग्ण; पंढरपूर, बार्शी अव्वल 
  • आज 394 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह तर तब्बल 20 जणांचा झाला मृत्यू 
  • बार्शी मृत्यूदरात अव्वल, तर रुग्णसंख्येत पंढरपूर नंबर एकवर 
  • शहरातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला; ग्रामीणनेही वाढविली चिंता 

अक्‍कलकोटमधील आदर्श नगर, दुधनी, हल्लाळी, पालापूर, तळेवाड, बार्शीतील अलीपूर रोड, आझाद चौक, बावी, भागवत कॉलनी, बोरगाव खु., भवानी पेठ, कॅन्सर हॉस्पिटल, दारफळ, देशमुख प्लॉट, गाडेगाव रोड, धस पिंपळगाव, फुले प्लॉट, गांधी स्टॉप, होनराव प्लॉट, जैन मंदिर रोड, जावळी प्लॉट, कळंबवाडी, कासारवाडी रोड, कासारवाडी, कसबा पेठ, कुर्डूवाडी रोड, लक्ष्मी नगर, मुंगशी, पाटील प्लॉट, पिंपरी, राळेरास, साई नगर, सौंदरे, सुर्डी, सुभाष नगर, सोलापूर रोड, स्वराज कॉलनी, तानाजी चौक, उक्‍कडगाव, उपळे दुमाला, उपळाई रोड, व्हनकळस प्लॉट, सन्मित्र कॉलनी, तर करमाळ्यातील अलसुंडे, देवळाली, देवीचा मळा, फंड गल्ली, गजर गल्ली, गणेश नगर, गुळसडी, जातेगाव, जेऊर, जिंती, कानड गल्ली, केम, खांबेवाडभ, किल्ला वेस, कृष्णाजी नगर, पोथरे, राशीन पेठ, साडे, संभाजी नगर, सर्पडोह, शाहू नगर, शेळगाव, सिध्दार्थ नगर, एसटी कॉलनी, सुतार गल्ली, वंजारवाडी, वाशिंबे, वीट, झरे येथे नवे रुग्ण आढळले आहेत. माढ्यातील अंबड, बारलोणी, भोसरे, चांदवडी, चिंचगाव, चौधरी प्लॉट, धानोरे, कुर्डू, कुर्डूवाडी, म्हैसगाव, माळी गल्ली, मोडनिंब, पालवण, पिंपळनेर, रोपळे कव्हे, सन्मती नगर, शिंगेवाडी, श्रीराम नगर, तांदुळवाडी, टेंभूर्णी, वेणेगाव, विठ्ठलवाडी, माळशिरसमधील अकलूजमध्ये 25 रुग्ण, भांबुर्डी, दहिगाव, सर्जे हॉस्पिटलशेजारी, गणेशगाव, गारवाड, घाडगे गल्ली, कचरेवाडी, खंडाळी, लवंग, मळेवाडी, माळीनगर, मानकी, मोरोची, नातेपुते, एसटी स्टॅण्डजवळ, संग्राम नगर, शिक्षक कॉलनी, वालकुंडे मळा, यशवंत नगर, मंगळवेढ्यातील चोखामेळा नगर, दामाजी नगर, ढवळस, डोणज, डोंगरगाव रोड, गणेशवाडी, गारनिकी, कुंभार गल्ली, मेटकरी गल्ली, मुडे गल्ली, नागणे गल्ली, नागणेवाडी, सलगर बु., साठे नगर, शनिवार पेठ, शिवाजी पार्क, मोहोळमधील बेगमपूर, देगाव, लांबोटी, नजिक पिंपरी, मोहोळ रेल्वे स्टेशनजवळ, पाटकूल, उत्तर सोलापुराती तळेहिप्परगा, पंढरपुरातील अजोटी, अनवली, भजनदास चौक, चिालईवाडी, देगाव, देवडे, एकलासपूर, फत्तेपूर नगर, फुलचिंचोली, गवंडी गल्ली, गोपाळपूर, गुरसाळे, ईसबावी, करकंब, कासेगाव, खर्डी, कोर्टी, लक्ष्मीटाकळी, महावीर नगर, नेपतगाव, पळशी, रांझणी, सांगोला रोड, संत पेठ, सरकोली, स्टेशन रोड, सुलेमान चाळ, तिसंगी, उंबरपागे, विणेगल्ली, वाखरी, वांगीकर नगर, सांगोल्यातील अकोला, अनकढाळ, भीम नगर, चिंचोळी रोड, देशपांडे गल्ली, देवळे, हातीद, जवळा, जयभवानी चौक, जुना मेडशिंगी रोड, जुनोनी, कोळा, कोष्टी गल्ली, लक्ष्मीदहिवडी, लोहार गल्ली, महूद, मळवडी, मेडशिंगी, मिरज रोड, नाझरे, पाचेगाव खु., आरएच क्‍वॉर्टर, शिवाजी चौक, शिवणे, वाणी चिंचोळे, वासूद, विद्या नगर, दक्षिण सोलापुरातील मंद्रूप आणि विडी घरकूल याठिकाणी नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.


 
तालुकानिहाय रुग्णसंख्या (कंसात मृत्यू) 

  • तालुका रुग्ण 
  • पंढरपूर 3,266 (70) 
  • बार्शी 2,833 (117) 
  • माळशिरस 1,917 (38) 
  • माढा 1,360 (47) 
  • द. सोलापूर 1,097 (23) 
  • करमाळा 964 (25) 
  • सांगोला 842 (9) 
  • अक्‍कलकोट 743 (44) 
  • मोहोळ 702 (29) 
  • मंगळवेढा 627 (15) 
  • उ. सोलापूर 565 (22) 
  • एकूण 14,916 (439)  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com