esakal | शहर-ग्रामीणमधील कोरोना चाचण्यांत घट ! आज पुन्हा लसीकरण बंदच
sakal

बोलून बातमी शोधा

Covid-19

शहर-ग्रामीणमधील कोरोना चाचण्यांत घट ! आज पुन्हा लसीकरण बंदच

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून ग्रामीणमधील रुग्णसंख्या अजूनही अपेक्षेप्रमाणे कमी झालेली नाही.

सोलापूर : शहरातील कोरोनाचा (Covid-19) संसर्ग कमी झाला असून ग्रामीणमधील रुग्णसंख्या अजूनही अपेक्षेप्रमाणे कमी झालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर दररोज 10 ते 15 हजार संशयितांची कोरोना टेस्टिंग (Covid-19 Testing) अपेक्षित आहे. तरीही, सोमवारी ग्रामीणमधील चार हजार 465 तर शहरातील 503 संशयितांचीच कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ग्रामीणमध्ये 295 तर शहरातील दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर ग्रामीणमधील तीन तर शहरातील एकाचा कोरोनाने बळी घेतला आहे. दरम्यान, लसीअभावी आज (मंगळवारी) पुन्हा शहर-ग्रामीणमधील लसीकरण (Covid Vaccination) बंद ठेवावे लागणार आहे. (Corona testing in urban and rural areas has been reduced and vaccination is also closed on Tuesday-ssd73)

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची सपत्नीक महापूजा!

जिल्ह्यातील अंदाजित 700 गावे कोरोनामुक्‍त झाली आहेत. तरीही, उर्वरित सव्वातीनशे गावांमधील रुग्णांची संख्या कमी करण्यात प्रशासनाला यश मिळालेले नाही. सोमवारी पंढरपूर तालुक्‍यात सर्वाधिक 115 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर माळशिरस तालुक्‍यातील 70, सांगोल्यातील 27, मोहोळ तालुक्‍यातील 25, करमाळ्यातील 22, माढ्यात 19, बार्शी व दक्षिण सोलापूर या दोन्ही तालुक्‍यांत प्रत्येकी पाच रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे (Mucormycosis) तीन रुग्ण वाढले असून या आजाराच्या रुग्णांची संख्या आता 599 झाली आहे. त्यापैकी साडेचारशे रुग्ण बरे झाले असून सध्या 66 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दुसरीकडे, शहराला सोमवारी दिलासा मिळाला असून शहरात अवघे दोन रुग्ण आढळले आहेत. प्रभाग क्रमांक दोन व 17 मध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णांचा वेळेत शोध घेणे आवश्‍यक आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोना चाचण्या वाढविण्याची गरज असून त्यात सातत्य राहायला हवे. दरम्यान, कोरोनाला रोखण्याचा ठोस कृती आराखडा प्रशासनाकडे नसल्यानेच संसर्ग पूर्णपणे कमी होत नसल्याचेही बोलले जात आहे.

हेही वाचा: "जबाबदारीने काम करून संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करूया!'

अक्‍कलकोट, उत्तर सोलापुरात रुग्ण नाही

जिल्ह्यातील जवळपास 20 लाखांहून अधिक संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. शहरातील 28 हजार 791 पैकी 27 हजार 271 तर ग्रामीणमधील एक लाख 42 हजार 43 रुग्णांपैकी एक लाख 36 हजार 181 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, ग्रामीणमधील अक्‍कलकोट व उत्तर सोलापूर या दोन्ही तालुक्‍यात सोमवारी एकही रुग्ण आढळला नाही. दुसरीकडे बार्शी, दक्षिण सोलापूर व मंगळवेढ्यातील ससंर्गही कमी होऊ लागल्याचे दिसून येत आहे. तर शहरातील रुग्णसंख्या देखील कमी झाली असून त्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग व पोलिस प्रशासनासह शिक्षण विभागाचे मोठे योगदान राहिले आहे.

loading image