esakal | झेडपी सभेपूर्वी कोरोना चाचणी बंधनकारक! सोमवारी होणार सर्वसाधारण सभा
sakal

बोलून बातमी शोधा

झेडपी सर्वसाधारण सभेपूर्वी कोरोना चाचणी बंधनकारक! सोमवारी होणार सभा

झेडपी सर्वसाधारण सभेपूर्वी कोरोना चाचणी बंधनकारक! सोमवारी होणार सभा

sakal_logo
By
प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर जिल्हा परिषदेची ऑफलाइन सर्वसाधारण सभा सोमवारी दुपारी दोन वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात होणार आहे.

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेची (Solapur Zilla Parishad) ऑफलाइन सर्वसाधारण सभा सोमवारी (ता. 26) दुपारी दोन वाजता सोलापुरातील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात होणार आहे. या सभेत सहभागी होण्यासाठी सदस्यांना आणि अधिकाऱ्यांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. रॅपिड अँटिजेन टेस्टच्या माध्यमातून सभागृहाच्या बाहेर कोरोना (Covid-19) चाचणी केली जाणार आहे. कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्या व्यक्तींना सभागृहात प्रवेश दिला जाणार आहे. (Corona testing is mandatory for members before the ZP meeting on Monday-ssd73)

हेही वाचा: रूपाली चाकणकर म्हणाल्या, मोदींच्या दाढीप्रमाणे वाढताहेत इंधनाचे दर!

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. या सभेला सदस्यांनी कडाडून विरोध केला. सर्वसाधारण सभा ही ऑफलाइन व्हावी, अशी आग्रही मागणी सदस्यांनी केली होती. या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरच सदस्यांनी ठिय्या मांडला होता. जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांच्या सदस्यांनी ठिय्या आंदोलनात सहभाग घेत ऑनलाइन सभा तहकूब केली होती. तहकूब झालेली ती सभा आता सोमवारी (ता. 26) होणार आहे.

हेही वाचा: निलंबित आमदारांना वेतन व भत्ता नाहीच! आमदारांना दरमहा "इतके' वेतन

परवानगीची काय गरज?

शासनाच्या नियमानुसार सभागृहाच्या बैठक व्यवस्था क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीत जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑफलाइन पद्धतीने घेण्यास कोणाच्या परवानगीची आवश्‍यकता नाही. शासनाच्या नियमावलीतील तरतुदीनुसार कोरोनाच्या नियमांचे पालन करून सोमवारीच सभा होणार आहे. डॉ. फडकुले सभागृहाची बैठक क्षमता 300 व्यक्तींची आहे. झेडपीचे सदस्य, अधिकारी यांची संख्या 150 च्या दरम्यान होते. 50 टक्के उपस्थितीचा नियम पाळून सभा होत असल्याने या सभेस कोणाच्या परवानगीची आवश्‍यकता नसल्याची माहिती जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

loading image