esakal | रूपाली चाकणकर म्हणाल्या, मोदींच्या दाढीप्रमाणे वाढताहेत इंधनाचे दर !
sakal

बोलून बातमी शोधा

रूपाली चाकणकर म्हणाल्या, मोदींच्या दाढीप्रमाणे वाढताहेत इंधनाचे दर !

रूपाली चाकणकर म्हणाल्या, मोदींच्या दाढीप्रमाणे वाढताहेत इंधनाचे दर!

sakal_logo
By
प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

पंतप्रधान मोदी यांच्या दाढीसारखे गॅसचे दर वाढत असल्याची बोचरी टीका राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केली.

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सत्तेवर येऊन सात वर्षे झाली. निवडणुकीपूर्वी गॅस (Gas), पेट्रोलचे (Petrol) दर कमी करतो म्हणून आश्वासन दिले. मोदींच्या भूलथापांना बळी पडून नागरिकांनी मतदान केले. मात्र आज परिस्थिती उलट आहे. गॅसचे दर साडेतीनशेवरून 850 वर गेले आहेत. पेट्रोल 106 रुपये झाले. पंतप्रधान मोदी यांच्या दाढीसारखे गॅसचे दर वाढत असल्याची बोचरी टीका राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar, State President of NCP Women's Congress) यांनी केली. (Rupali Chakankar criticized the Modi government over the fuel price hike-ssd73)

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची सपत्नीक महापूजा!

उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने सुभद्रा मंगल कार्यालयात घेतलेल्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, नगरसेविका सुनीता रोटे, राष्ट्रवादीच्या जिल्हा निरीक्षक दीपाली पांढरे, पश्‍चिम महाराष्ट्र निरीक्षक भारती शेवाळे, डॉ. दादाराव रोटे यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

प्रदेशाध्यक्षा चाकणकर म्हणाल्या, संघटना म्हणून तुम्ही आवाज उठवा. आंदोलनाच्या माध्यमातून महागाई विरोधात राग व्यक्त करा. संघटनांमधून प्रश्न सोडवले पाहिजे म्हणून महिला मेळावा आयोजित केला आहे. कोणतेही प्रश्न असले तरी पहिले आंदोलन सोलापूरमध्ये होते, याचे कौतुक वाटते.

हेही वाचा: "जबाबदारीने काम करून संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करूया!'

कार्याध्यक्ष संतोष पवार म्हणाले, पक्ष व संघटना वाढीसाठी मेळावा घेणे गरजेचे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी घराघरात पोचेल. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत नक्कीच राष्ट्रवादीला फायदा होईल. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये महिलांना सन्मान दिला जातो. सरकारी नोकऱ्यांमध्ये तीस टक्के जागा राखीव देणारा हा पक्ष आहे. दोन देशमुखांच्या भांडणामुळे सोलापूरकर कंटाळले आहेत. महिलांनी एकजुटीने काम केल्यास महापालिकेच्या निवडणुकीत महापौर राष्ट्रवादीचा होईल.

- उमेश पाटील, प्रवक्ते, राष्ट्रवादी कॉंग्रेस

loading image