पंढरपूर : कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) आता पंढरीच्या वेशीवर येऊन ठेपला आहे. माळशिरस तालुक्यातील अकलूज आणि माळीनगर येथे दोन नवे कोरोनाचे संशयित रूग्ण आढळून आले आहेत. कोरोना रूग्ण आढळून आल्याने आषाढी वारीवर (Ashadhi Wari) सावट निर्माण झाले आहे. या नव्या संकटामुळे आरोग्य विभागातही मोठी खळबळ उडाली आहे.