esakal | राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला पुन्हा गर्दी, कोरोना नियम पायदळी
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला पुन्हा गर्दी, कोरोना नियम पायदळी

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला पुन्हा गर्दी, कोरोना नियम पायदळी

sakal_logo
By
नामदेव कुंभार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमाला पुन्हा एकदा गर्दी झाल्याचं समोर आलं आहे. जयंत पाटील आज, शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याचं समोर आलं आहे. यावेळी कोरोना नियमांचं पायमल्ली झाल्याचेही दिसून आलं. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला तर काही कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर मास्कही दिसला नाही. याआधी पुण्यातील कार्यलाय उद्घाटनावेळी शेकडो लोकांनी गर्दी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना चांगलेच झापले होते.

एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गर्दी टाळण्याचं आवाहन करत आहेत. त्याचवेळी दुसरीकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र कोरोना नियम मोडत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या व्हर्च्युअल बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांत होणाऱ्या गर्दीबद्दल चिंता व्यक्त करून राष्ट्रीय धोरण ठरवण्याची विनंती केली होती. अशातच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मात्र कोरोना नियमांना हरताळ फासल्याचं चित्रं आज सोलापुरात दिसलं.

हेही वाचा: कोरोनानंतर Monkeypox चा धोका; अशी आहेत लक्षणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सोलापुरात एमआयएमच्या माजी शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्या मुलासह सहा नगरसेवकांच्या नातेवाईकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. अनेकांच्या चेहऱ्यांवर मास्कही नव्हता आणि सोशल डिस्टन्सिंगचा तर पुरता फज्जा उडाला. जयंत पाटील यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच कार्यकर्त्यांना गर्दी कमी करण्यास सांगितलं. जितकी परवानगी आहे तितकेच लोक कार्यक्रमाला हजर राहा, इतरांनी बाहेर थांबा, अशा सूचना केल्या होत्या. मात्र, कार्यर्त्यांनी एकही ऐकलं नाही.

loading image