esakal | 'शासनाकडून लसपुरवठा होत नाही, मग माझ्या खिशातून करू का?'
sakal

बोलून बातमी शोधा

Shivashankar-Patil

'शासनाकडून लसपुरवठा होत नाही, मग माझ्या खिशातून करू का?'

sakal_logo
By
वेणुगोपाळ गाडी

शहरासाठी पुरेसे लस उपलब्ध होत नसल्याने सर्वसामान्यांचे हाल होत असल्याबद्दल भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी गुरुवारी आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.

सोलापूर : शहरासाठी पुरेसे लस (Vaccine) उपलब्ध होत नसल्याने सर्वसामान्यांचे हाल होत असल्याबद्दल भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील (BJP corporator Suresh Patil) यांनी गुरुवारी आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन (Agitation) केले. यावरून पाटील व आयुक्त पी. शिवशंकर (Municipal Commissioner P. Shivshankar) यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. पाटील यांच्या एका प्रश्‍नावर आयुक्तांनी केंद्र व राज्य सरकारकडून शहराला पुरेसा लसपुरवठा होत नाही, तेव्हा मी माझ्या खिशातून लशींचा पुरवठा करू का? असा प्रतिसवाल पाटील यांना केला. (Corporator Suresh Patil agitated as corona vaccination was not going well)

हेही वाचा: होनमुर्गीत रोखले दोन बालविवाह ! चाईल्ड लाइनच्या कॉलवरून कारवाई

दुकानात काम करणारे कर्मचारी, कारखान्यांतील कामगारांसाठी लसीकरण सक्तीचे आहे. मात्र, पुरेसे लस उपलब्ध होत नसल्याने कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न उद्‌भवत आहे. यासंदर्भात श्री. पाटील यांनी महापालिका आयुक्तांना याआधी पुरेसा लससाठा उपलब्ध होण्याविषयी पत्र दिले होते. त्यावर आयुक्तांकडून उत्तर न आल्याने पाटील हे गुरुवारी आयुक्तांना भेटण्यासाठी आले होते. मात्र काही क्षणापूर्वीच आयुक्त आपल्या कार्यालयातून बाहेर पडले होते. त्यामुळे पाटील यांनी आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या मांडला.

हेही वाचा: रत्नागिरी जि. प. तील 5 जणांची खातेनिहाय चौकशी होणार

आयुक्तांना ही बाब कळताच त्यांनी अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांना पाटील यांचे निवेदन स्वीकारण्यात सांगितले. यावर खोराटे यांनी आयुक्त कार्यालयात पाटील यांच्याशी चर्चा केली. यानंतर तीन वाजता आयुक्त महापालिकेत आले. त्या वेळी पाटील यांनी पुरेसा लसपुरवठा का होत नाही, असा सवाल करीत आयुक्तांना धारेवर धरले. यावर खवळलेल्या आयुक्तांनी "सरकारकडूनच मुबलक पुरवठा होत नसेल तर मी माझ्या खिशातून लशींचा पुरवठा करू का?' असा प्रतिसवाल केला. यावर पाटील यांनी संतप्त होत, आजवर सरकारकडे लशीसाठी किती पत्रव्यवहार केला, असा प्रश्‍न केला. यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.

loading image