esakal | होनमुर्गीत रोखले दोन बालविवाह ! चाईल्ड लाइनच्या कॉलवरून कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Child Marriage

होनमुर्गीत रोखले दोन बालविवाह ! चाईल्ड लाइनच्या कॉलवरून कारवाई

sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

बाल कल्याण समितीच्या पथकाने दोन्ही बालविवाह थांबवून दोन अल्पवयीन मुलींची बालगृहात रवानगी केली आहे.

सोलापूर : बाल कल्याण समितीच्या (Child Welfare Committee) एका पथकाने होनमुर्गी येथे दोन बालविवाह (Child Marriage)) रोखण्यात यश मिळविले आहे. एक बालविवाह रोखत असताना त्याच मंडपात दुसराही बालविवाहाचा प्रकार उघडकीस आला. बाल कल्याण समितीच्या पथकाने दोन्ही बालविवाह थांबवून दोन अल्पवयीन मुलींची बालगृहात रवानगी केली आहे. (Two child marriages in Honmurgi were prevented by a call from Child Line)

हेही वाचा: मराठा समाज आरक्षणाचा तो 'भाजपमय आक्रोश'!

चडचण (कर्नाटक) (Karnataka) येथील एका 17 वर्षीय बालिकेचा विवाह गुप्त पद्धतीने पहाटे पाच वाजता दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील होनमुर्गी येथील युवकाशी होणार असल्याची माहिती चाईल्ड लाइनद्वारे (Child Line) जिल्हा बाल संरक्षण कक्षास (District Child Protection Cell) मिळाली. या माहितीच्या आधारे मंद्रूप ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितीन थेटे, पोलिस नाईक प्रदीप बनसोडे, महिला पोलिस कॉन्स्टेबल आर. एस. शेख, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे, आर. यू. लोंढे यांचे पथक पहाटे साडेचार वाजता होनमुर्गीच्या दिशेने रवाना झाले. विवाहस्थळी तत्परतेने पोचून होत असलेला बालविवाह त्यांनी रोखला.

हेही वाचा: खरीप हंगामाच्या पीक विम्याची मुदत 15 जुलैपर्यंत !

याच ठिकाणी त्या 17 वर्षीय बलिकेच्या 16 वर्षीय चुलत बहिणीचाही विवाह होत असल्याचे चौकशीअंती पथकाच्या निदर्शनास आले. या बालिकांचा विवाह त्यांच्या नात्यातील युवकांशी होणार होता. सदरील दोन्ही बालविवाह थांबवून पथकाने त्या दोन बालिकांना बाल कल्याण समिती, सोलापूर यांच्यासमोर हजर केले असता, बाल कल्याण समितीने त्या दोन बालिकांची बालगृहात रवानगी केली आहे. ही कारवाई जिल्हा महिला बाल विकास अधिकारी डॉ. विजय खोमणे, परिविक्षा अधिकारी दीपक धायगुडे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा अनुजा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

loading image