पोस्टल मताने मतमोजणीस सुरवात ! दोन तासांत समजणार पहिला निकाल; तालुकानिहाय आहेत बंदोबस्तासाठी दोन हजार 900 पोलिस

31sarpanch_1_4.jpg
31sarpanch_1_4.jpg

सोलापूर : जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून उद्या (सोमवारी) 587 ग्रामपंचायतींची मतमोजणी होणार आहे. सकाळी साडेआठ वाजल्यापासून प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी मतमोजणीस प्रारंभ होणार असून सुरवातीला पोस्टल मतमोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएममधील मते मोजली जातील, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्पष्ट केले. सकाळी साडेदहा वाजेपर्यंत पहिला निकाल हाती येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

...तर थेट गुन्हा दाखल होईल
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर भांडणे होणार नाहीत, याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. विनापरवाना गावांमध्ये बॅनर, फ्लेक्‍स लावणे, मिरवणुका काढल्यास संबंधितांवर थेट गुन्हा दाखल करुन कारवाई केली जाईल.
- तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक, सोलापूर

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी सहा लाख 17 हजार 572 महिला तर सहा लाख 69 हजार 345 पुरुष आणि 17 इतर मतदार आहेत. त्यापैकी इतर तीन मतदारांसह चार लाख 86 हजार 792 महिलांनी व पाच लाख 60 हजार 546 पुरुषांनी मतदान केले. मागील निवडणुकीच्या तुलनेत कोरोनाचे संकट असतानाही यंदा मतदानाचा टक्‍का वाढला आहे. आता मतमोजणीसाठी दोन हजार 322 केंद्रे असून त्याठिकाणी एक हजार 72 कर्मचारी असतील. एकूण 82 फेऱ्यांद्वारे मतमोजणी पार पडणार असून त्यात मोहोळ तालुक्‍यात सर्वाधिक 34 फेऱ्या आहेत. त्यापाठोपाठ बार्शी 33 फेऱ्या, सांगोला 25, माढा 30, करमाळ्यात 18, अक्‍कलकोटमध्ये 15, माळशिरसमध्ये 14, मंगळवेढ्यात 12, उत्तर सोलापुरात दहा, पंढरपूर आठ आणि दक्षिण सोलापुरात नऊ फेऱ्या होणार आहेत.

बाहेरुन मागविला पाचशे कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त
ग्रामीण पोलिस दलातील अडीच हजारांपैकी अठराशे कर्मचारी आणि सहाशे होमगार्ड बंदोबस्तासाठी नेमले आहेत. मतमोजणीच्या ठिकाणी 93 अधिकारी, 808 कर्मचारी, 693 होमगार्ड असतील. तर मतदान झालेल्या गावांमध्ये 93 अधिकारी, 808 पोलिस, 693 होमगार्ड आणि पेट्रोलिंगसाठी 37 अधिकारी, 432 कर्मचारी, 246 होमगार्ड आणि 66 वाहने नियुक्‍त केले आहेत. दुसरीकडे राज्य राखीव बलाची एक तुकडी, एक प्लाटून तुकडी, 11 स्ट्रायकिंग फोर्स, एक आरसीपी पथक व दोन क्‍युआरटी पथकाची नियुक्‍ती केल्याचे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com