Brutal robbery in Galandwadi, Mohol Taluka: Couple attacked with sickle and looted.
sakal
मोहोळ: शेतात राहणाऱ्या पती-पत्नीस चाकू व कोयत्याने मारहाण करून, जिवे ठार मारण्याची धमकी देऊन, घरातील सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल असा दोन लाख ६१ हजारांचा ऐवज चोरट्याने दरोडा टाकून चोरून नेल्याची घटना गलंदवाडी (ता. मोहोळ) येथे घडली. मंगळवारी (ता. ९) मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, चोरटे जाताना घराला बाहेरून कडी लावून गेले. या झटापटीत तानाजी थिटे व त्यांच्या पत्नी सिंधू थिटे हे जखमी झाले आहेत.