अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी वृध्दास दहा वर्षे सक्तमजुरी

आरोपीस रात्र पाळी असल्याने तो दिवसभर घरीच असायचा तर पीडित मुलीचे आई-वडील हे दिवसभर शेताता काम करायचे.
court
courtsakal
Updated on: 

माळशिरस : चौदा वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी एका 60 वर्षाच्या वृध्दास माळशिरसचे जिल्हा व सत्र न्यायाधीश (Judge) एम. एन. पाटील यांनी दहा वर्षांची शिक्षा सुनावली. आप्पा बापू नामदास (रा. बाभूळगाव, ता. माळशिरस) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे (Criminal) नाव आहे. या घटनेतील फिर्याद व आरोपी आप्पा नामदास हे संगम, जांभुळ बेद येथे शेताता काम करीत होते. आरोपीस रात्र पाळी असल्याने तो दिवसभर घरीच असायचा तर पीडित मुलीचे आई-वडील हे दिवसभर शेताता काम करायचे.

पीडित मुलीचे आई-वडील कामावर जाताना आप्पा नामदास याला विश्वासाने मुलीवर लक्ष ठेवण्यास सांगायचे. या विश्वासाचा गैर फायदा घेत आरोपी नामदास पीडित मुलीला चहा करून दे, कामाचे दिवस मांडून दे म्हणून घरात बोलवायचा. एके दिवशी आरोपीने पीडित मुलीला घरात बोलावून तोंडात बोळा घालून चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला. ही घटना कोणास सांगितले तर तुला व तुझ्या आई-वडिलांना जीवे मारेन, अशी धमकी दिली. त्यानंतर एके दिवशी पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिच्या आई-वडिलांनी तिला डॉक्‍टरांकडे नेले. त्यावेळी डॉक्‍टरांनी ती गर्भवती असल्याचे सांगितले. त्यावेळी आई-वडिलांनी तिच्याकडे विचारणा केली असता तिने हा प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने आरोपी आप्पा नामदास याच्याविरुध्द अकलूज पोलिस ठाण्यात 2 जून 2018 रोजी तक्रार दाखल केली.

court
सोलापूर : जिल्ह्यात दोन अपघातात चौघे ठार तर चारजण जखमी

अकलूज पोलिसांनी पीडित मुलीला अकलूज येथील सरकारी दवाखान्यात पाठविले व तेथून सोलापूर येथील सिव्हील हॉस्पिटल येथे पाठवून तिची सोनोग्राफी केली. त्यावेळी पिडीत मुलगी ही 24 आठवड्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे मुलीचा गर्भपात करण्यात आला. त्यानंतर पीडितेचे व आरोपीचे रक्त डीएनए तपासणीसाठी पुणे येथे प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.

त्यात पुणे येथील प्रयोगशाळेतून पीडिता व आरोपी यांचाच गर्भ असल्याचा अहवाल आला. त्यानंतर अकलूज पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. टी. काटे यांनी सदर घटनेचा तपास करून आरोपीविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले. या घटनेत एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडित मुलीची साक्ष महत्वाची ठरली. सरकारी वकील म्हणून ऍड. संग्राम पाटील व ऍड. एस. ए. ढवळे यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Solapur Temperature Touches 38°C as Farmers Await Rain
The silver padukas footwear were stolen from this very spot in the temple
netaji khandagale and kiran jamdade
Central Team Inspects Drought-Hit Villages and Crop Damage in Mangalwedha, Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com