सोलापूर : जिल्ह्यात दोन अपघातात चौघे ठार तर चारजण जखमी

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वडाचीवाडी शिवारातील एका हॉटेल समोर आज पहाटे साडेसहा वाजता झाला.
accident
accidentsakal

पंढरपूर (सोलापूर) : ऊस वाहतूक (Sugarcane Transport) करणाऱ्या ट्रॅक्‍टरच्या ट्रॉलीला कारने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Accident) दोनजण ठार तर चारजण जखमी झाले. हा अपघात पंढरपूर-टेंभुर्णी रस्त्यावर गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याजवळ (Sugar Factory) आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास झाला. तर दुसऱ्या अपघातात रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मालट्रकला भरधाव जाणाऱ्या कारने मागून धडक देऊन झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. हा अपघात सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वडाचीवाडी शिवारातील एका हॉटेल समोर आज पहाटे साडेसहा वाजता झाला.

गोरसाळेजवळील अपघातातील मयत आणि जखमी हे नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि सिन्नर येथील आहेत. या अघातातील फिर्यादी किशोर संपत लोखंडे (वय 27, रा. चादोरी, ता. निफाड, जि. नाशिक) हे त्यांची पत्नी रेश्‍मा लोखंडे, मामा त्रिंबक मारुती आव्हाड, वेदांत मारुती आव्हाड, सुरज भीमराव ठोंबरे (रा. वडजेरीगाव, ता. सिन्नर) यांच्यासह एमएच 46/डब्ल्यू 8903 या क्रमांकाच्या ओमनी गाडीतून देवदर्शनासाठी पंढरपूरकडे येत होते. पंढरपूर-टेंभुर्णी रस्त्यावर गुरसाळे गावाच्या हद्दीत त्यांची गाडी आली असताना पुढे

accident
आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट; कर्नाटकी पोलिसांची दडपशाही

रिफ्लेक्‍टर नसलेला ट्रॅक्‍टर ट्रॉलीसह ऊस घेऊन निघाला होता. ओमनीचा चालक सौरभ प्रभाकर घोडके (रा. वडजेरीगाव, ता. सिन्नर) यास रिफ्लेक्‍टर नसलेली ट्रॉली न दिसल्याने भरधाव वेगात ओमनी गाडी ट्रॅक्‍टरच्या ट्रॉलीला मागून धडकून अपघात झाला. अपघातात ओमनी कारमधील संजीवनी मारुती आव्हाड (वय 35, रा. निफाड), सूरज भीमराव ठोंबरे (वय 21) या दोघांचा मृत्यू झाला. गाडीतील किशोर संपत लोखंडे, रेश्‍मा लोखंडे, त्रिंबक मारुती आव्हाड, वेदांत मारुती आव्हाड यांना पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातप्रकरणी किशोर लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ओमनीचा चालक सौरभ घोडके याच्याविरुद्ध पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com