सोलापूर : मोतीलाल नगरात क्रिकेटवर सट्टाबाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cricket betting

सोलापूर : मोतीलाल नगरात क्रिकेटवर सट्टाबाजी

सोलापूर: सोलापूर, ता. ११ : न्यू पाच्छा पेठेतील मोतीलाल नगर झोपडपट्टीत क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा खेळताना पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने रंगेहाथ पकडले. पोलिसांनी पंचनामा करून त्या तिघांविरूध्द जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल केला. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

टाटा आयपीएल-२०२२ अंतर्गत मंगळवारी (ता. १०) गुजरात टायटन विरुध्द लखनऊ सुपर जाईंट हा क्रिकेट सामना सुरु होता. त्या सामन्यावर सुनिल अशोक दाते, विनायक ईरप्पा पुरुड व चंदन विनुगोपाल बडगंची हे तिघे सट्टा घेत होते. क्रिकेट सामना पाहताना कोणत्या खेळाडूच्या किती धावा होतील, कोणता संघ टॉस जिंकेल, कोणता संघ विजयी होईल, यावर ते फोनवरून ऑनलाइन सट्टा घेत होते. पोलिस आयुक्त हरीश बैजल यांच्या पथकाला त्याची माहिती मिळाली. त्यानंतर विशेष पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक जीवन निरगुडे यांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. तेथून पोलिसांनी टीव्ही, लॅपटॉप, सात मोबाईल, सेटअप बॉक्स आणि कॅलक्युलेटर असा एक लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक निरगुडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार दिलीप भालशंकर, पोलिस नाईक योगेश बर्डे, वाजिद पटेल, पोलिस कॉन्स्टेबल संजय साळुंखे, नरेंद्र नक्का व सायबर सेलचे पोलिस कॉन्स्टेबल वसीम शेख यांच्या पथकाने केली.

Web Title: Cricket Betting Solapur Motilal Nagar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top