'मकाई'चे अध्यक्ष दिग्विजय बागलविरुद्ध गुन्हा  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

3digvijay_bagal_40karmala (2).jpg

ठळक बाबी... 

  • मकाई सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या पगारातून कापला भविष्य निर्वाह निधी 
  • भविष्य निर्वाह निधीतील कामगारांचा हिस्सा जमाच केला नसल्याचा ठपका 
  • कामगारांच्या त्याचे बत्तीस लाख 67 हजार 986 रुपये कारखान्याने केले कपात 
  • प्रतीक रामचंद्र लाखोले यांनी दिली सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद

'मकाई'चे अध्यक्ष दिग्विजय बागलविरुद्ध गुन्हा 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : करमाळा येथील श्री मकाई सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात करण्यात आली. त्यानुसार 32 लाख 67 हजार 996 रुपये भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे जमा करणे आवश्‍यक होते. मात्र, कारखान्याकडून ही रक्कम भरली गेली नाही. त्यामुळे भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील प्रतीक रामचंद्र खोकले यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय दिगंबर बागल व प्रभारी कार्यकारी संचालक हरिश्‍चंद्र प्रकाश खाटमोडे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

ठळक बाबी... 

  • मकाई सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या पगारातून कापला भविष्य निर्वाह निधी 
  • भविष्य निर्वाह निधीतील कामगारांचा हिस्सा जमाच केला नसल्याचा ठपका 
  • कामगारांच्या त्याचे बत्तीस लाख 67 हजार 986 रुपये कारखान्याने केले कपात 
  • प्रतीक रामचंद्र लाखोले यांनी दिली सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद 

भिलारवाडी (ता. करमाळा) येथे श्री मकाई सहकारी साखर कारखाना आहे. या कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा हा भविष्य निर्वाह निधीपोटी ठराविक रक्कम कपात केली जाते. भविष्य निर्वाह निधीची रक्कम कार्यालयाकडे वर्ग करणे बंधनकारक आहे. मात्र, मागील काही महिन्यात ती रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे भरलीच नाही, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 

पोलिसानी मागितले आणखी पुरावे 

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय दिगंबर बागल व प्रभारी कार्यकारी संचालक हरिश्‍चंद्र प्रकाश खाटमोडे यांच्याविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. चानकोटी हे करीत आहेत. या प्रकरणातील अधिक पुरावे हाती यावेत म्हणून पोलीस भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून आणखी पुरावे गोळा करणार आहेत. त्यानंतर संशयित आरोपीविरुद्ध कारवाई केली जाईल, पोलिसांकडून सांगण्यात आले.

loading image
go to top